ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

त्यातच आता कर्जत जमखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावरून ‘भाजपमधील मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं’ अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता म्हणले की, आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता 5 वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा! असे म्हटले आहे.
राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊ असे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, आम्ही एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्या लढवणार असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते. बिहार राजकारणाचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रात ही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली होती.








