ऑनलाईन टीम / मुंबई
देशात कोरोना संसर्गाचा कहर सुरु असताना कोरोना उपायोजनांवरुन अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात साडलेले पतंजली संस्थापक योगगुरु रामदेव बाबा यांचा नवा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रामदेव बाबा यांनी आपल्या अटकेसंर्दभात एक विधान केलं असून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” असं विधान केलं असून
सोशल मीडियावर ठग रामदेव, अरेस्ट रामदेव, क्वीक अरेस्ट स्वामी रामदेव, ठग रामदेव, महाठग रामदेव असे ट्रेंड चालवले जातात ज्यांनी असे ट्रेंड चालवले जातात आणि ते सर्वाच्च स्थानी पोहोचतात त्याबद्दल त्यांना शूभेच्छा ही रामदेव बाबा यांनी दिल्या आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेव बाबा यांना चांगलच ट्रोल करत त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. हा वादग्रस्त व्हिडिओ नेमका कधीचा आहे, या बद्दल निश्चितता नसली तरी सोशल मीडियावरही रामदेवबाबांविरोधात एक मोहीम सुरू आहे. रामदेवबाबा यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत. तसेच सोशल मिडियावर थेट कायद्याला वेटीस धरणाऱ्यांना तड़जोड नको या आशयाचे संदेश व्हायरस होत आहेत.