ऑनलाईन टीम / मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय काँग्रेसच्या गोटात मोठी खलबतं सुरु आहेत. तरी ही राष्ट्रीय काँग्रेसला स्थिरता आलेली नाही. अध्यक्ष कोण ?हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर गेले काही दिवस सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद आहे. मात्र पुर्णवेळ अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय काँग्रेस अद्याप प्रतिक्षेतच आहे. या कारणावरुन चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
याबद्दल काँग्रेस पक्षाच्या एका गटाने ही या प्रकारची मागणी केली आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही या विषयावर भाष्य केल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. यावर राऊत यांनी काँग्रेसला या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सल्ला दिला आहे. काँग्रेस हा देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाने अनेक मोठे नेते दिले आहेत. अशा वेळी पक्षाला जर अध्यक्ष नसेल तर लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होणारचं. राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही. तशी मागणी झाल्यास त्यात गैर काय असणार नाही असे ही राऊत यावेळी म्हणाले.
याच बरोबर काँग्रेसची अवस्था हेडलेस अर्थात नेतृत्वहीन झाल्याचं म्हटलं आहे. “जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चित्र दिसतंय. याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेत आहेत. असे ही त्यांनी यावेळी वक्तव्य केलं.