वार्ताहर / जमखंडी
तालुक्मयातील तोदलबागी येथील 23 एकर 19 गुंठय़ांच्या जागेतील अतिक्रमण तहसीलदार एस. बी. इंगळे व सीपीआय डी. के. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. काही दिवसांपासून सदर जागेत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यानुसार 35 पत्र्याचे शेड्स, 3 मंदिरे, 1 मशीद, 8 कडबा गठ्ठय़ा, 4 कचराकुंड हटविण्यात आले. यावेळी सावळगी पीएसआय एस. बी. घाटगे, जमखंडी शहर पीएसआय गोविंदगौड पाटील, ग्रामीण पीएसआय बसवराज अवटी, महसूल निरीक्षक वाय. एच. द्राक्षी आदी उपस्थित होते.









