वार्ताहर / यड्राव
तारदाळ तालुका हातकणंगले येथील महेश सूतगिरणी समोरील गोपाळ नामदेव पवार यांच्या घरात जबरदस्तीने घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ करत सामानाची झडती घेणाऱ्या कर्नाटकातील दोघा तोतया पोलिसांना आज शहापूर पोलिसांनी अटक केली. मोहन सुरेश पवार वय वर्षे 20 राहणार साखरवाडी निपाणी व मारुती प्रकाश कुंभार वय 40 राहणार नैइग्लज तालुका चिकोडी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहापूर पोलिसांनी याबाबत अधिक तपास केले असता या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली. या मोटरसायकलचे तपासणी करीत असताना शिट खाली एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले ते जप्त करण्यात आले. या दोघा संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रकाश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्टेबल महेश कोरे ज्ञानेश्वर बांगर अमर पाटील सुनील बाईत अमित भोरे आदींनी केली.
Previous Articleउस्मानाबाद जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांनी पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा
Next Article आसाममधून 25 कोटी रुपयांचे हेरोईन जप्त, एकाला अटक









