काही वेळा आपण तोंडावाटे श्वास घेतो. गर्दीच्या ठिकाणी किंवा नाक बंद झाले तर किंवा कोंदट जागा असेल किंवा झोपेत तोंडावाटे श्वास घेतो. परंतु दीर्घकाळापर्यंत तोंडावाटे श्वास घेतल्याने आरोग्यविषयी समस्या निर्माण होतात.
- फुफ्फुसापर्यंत हवा जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक नाक आणि दुसरे तोंड. नाकातून श्वास घेणे हे सामान्यपणे मानले जाते. परंतु काही जण तोंडावाटे श्वास घेतात, विशेषतः रात्री झोपेत असताना.
- आपण नाकावाटे श्वास घेतो आणि तो सोडतो, यास आपण नेजल ब्रीदिंग असे म्हणतो.
- एखाद्या कारणामुळे नाक बंद होते, तेव्हा तोंडावाटे श्वास घेतला जातो. परंतु तोंडावाटे श्वास घेणे हानीकारक आहे.
- अलीकडेच सेलिब्रिटी आहारतज्ञ पूजा मखिजाने ‘इंस्टाग्राम’वर तोंडावाटे श्वास घेण्याचे दुष्परिणाम सांगितले आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी नाकाने श्वास घेणे किती उपयुक्त आहे, हे देखील सांगितले आहे.
- मखिजा म्हणते की, आपल्या शरीरात दोन ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम असतात. सिम्पेथेटिक आणि पॅरासिम्पेथेटिक.
- सिम्पेथेटिक शाखा ही आपल्याला लढण्याची क्षमता प्रदान करते आणि पॅरासिम्पेथेटिक शाखा ही पचन, स्वभाव आणि मैत्रिपूर्ण हालचालीसाठी जबाबदार धरली जाते.
- पुढे ती म्हणते की, तोंडावाटे श्वास घेण्याची क्रिया ही शरीराला सिम्पेथेटिक स्थितीकडे नेणारी असते. तर नाकावाटे श्वास घेण्याची प्रक्रिया पॅरासिम्पेथेटिक प्रतिक्रिया सक्रिय करते.
- शरीर जुन्या व्याधी आणि श्वास घेण्याच्या त्रासामुळे या स्थितीत अडकले असेल तर ते आपल्याकडून केल्या जाणार्या सर्व एचआयआयटी वर्कआऊटचे चांगले परिणाम देऊ शकत नाही.
- विशेषतः वजन कमी करण्यासाठी नाकावाटे श्वास घेणे फायद्याचे आहे, असे मखिजा म्हणते.
- आपले शरीर रात्रीच्या वेळी सर्वाधिक आराम करते. त्यामुळे या काळात श्वसनप्रक्रिया महत्त्वाची असते. ही प्रक्रिया आपल्या नर्व्हस सिस्टिमला आराम आणि पचनक्रियेत परावर्तित करते. या कारणामुळे वजन कमी करण्यासाठी नाकावाटे श्वास घेणेच फायद्याचे आहे.
- चांगल्या दर्जाचे व्हिटॅमिन सी सप्लीमेंट आणि खाद्यपदार्थ, हळद, झिंकयुक्त खाद्यपदार्थ आणि सप्लिमेंट हे नाकावाटे श्वास घेण्यातील अडथळे दूर करतात. त्याचा योग्य डोस आणि कालावधीसाठी आपण आहारतज्ञांशी सल्लामसलत करावी.
- जेव्हा आपण नाकावाटे श्वास घेतो तेव्हा ते एखाद्या फिल्टरमधून गाळून पाणी जसे बाहेर पडते तसा श्वास हृदयात जातो. याशिवाय शरीरात तापमान राखण्यासाठी देखील मदत करते.
- दुसरीकडे तोंडाने श्वास घेतल्यास घसा कोरडा पडतो. वास्तविक तोंडावाटे श्वास घेतल्याने अनेक अडचणी येऊ शकतात. जसे की घोरणे, दातांची समस्या, थकवा, चिडचिडेपणा, तोंडाला वास येणे. त्यामुळे तोंडाऐवजी नाकाद्वारे श्वास घेण्याबाबत आपण प्रयत्नशील असावे.









