भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला पुढे म्हणतात-विषयसुख नरकामध्येही मिळू शकते. परंतु त्या लोकांचे मन विषयांमध्येच गुंतलेले असते. म्हणूनच त्यांना नरकात जाणे सुद्धा चांगले वाटते.
पट्टमहिषिये गृहेश्वरी । ऐकें विदर्भनृपकुमारी ।
माझ्या ठायीं अनुवृत्ति पुरी । केली निर्धारिं एकदाचि ।
ते तूं अनुवृत्ति कैसी म्हणसी । जे मोक्ष देऊनि भवातें निरसी । दिष्टय़ा म्हणिजे कल्याणराशि । निश्चयेंसी तुज लब्ध । हेंचि महाभाग्य जाण । आकल्प जोडिलें निष्काम पुण्य । निष्काम अनुवृत्तीसी कारण । भवमोचन ज्या योगें । येर ज्या सकाम दुर्वृत्ता नारी। दुष्ट अभिपाय ज्यां अंतरिं । वंचनपरा सर्वांपरी। दुराचारी दुर्भाग्या । यास्तव प्राणतर्पणपरा । वशवर्तिनी खळविकारा । निष्काम अनुवृत्तीचा वारा। त्यांसी दुष्कर जाण पां । ऐसिया बुडती भवसागरिं । विषय कामिती नानापरी । दुष्ट मनोरथ ज्यां अंतरिं । प्राणपोषणपरायणा । असो त्या दुर्भगांचिया गोष्टी । तुजसारिखी इये सृष्टी । धन्यतमा अन्य गोरटी । न देखें दृष्टी भीमकिये ।
श्रीकृष्ण रुक्मिणीला पुढे म्हणतात-हे गृहस्वामिनी! तू आतापर्यंत संसार-बंधनातून मुक्त करणाऱया माझीच निरंतर सेवा केली आहेस. ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. संसारमुक्त माणसे असे कधीच करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळय़ा प्रकारची कपटकारस्थाने करीत असतात, त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे.
ऐकान्तिकी निष्कामभक्ति । भीमकीची अनन्य प्रीति । स्वमुखें सम्मानी श्रीपति । पूर्वानु÷ितें स्मरोनी ।
तुजसारिखी इये त्रिभुवनीं । न देखें अन्य प्रणयिनी ।
विनयभावें माझ्या भजनीं । कायवाड्मनीं मन्नि÷ा ।
गृहिणी म्हणीजे गृहमेधिनी । पोष्यवर्गाच्या प्रतिपालनीं । ज्ये÷ां श्रे÷ांचिया सम्मानीं । विनयगुणीं अनुकूळ । ऐसी कोठें कोणे गृहीं । तुजसारिखी दुसरी पाहीं । आम्ही कदापि देखिली नाहीं । कान्तविषयीं अनीर्ष्या। अवो मानिनि स्वविवाहकाळीं । विख्यात भूभुज भूमंडळीं । तिया नृपांची मंडळी । जिणें त्यागिली वमनवत् । कळो नेदितों मातापितरां। विप्र धाडिला द्वारकापुरा । पत्रिकालेखनें अभ्यंतरा। निजनिर्धारा जाणविलें । वैष्णव जे मत्परायण। तयांच्या मुखें मत्कथाश्रवण । होतां मन्न÷ि अंतःकरण । जाणोनि हरण म्यां केलें । तैंहूनि माय माहेरिंची । सोडोनि दिधली सर्वही रुचि । कदापि गोष्टी बंधुवर्गाची । ना इतरांची न काढिसी । माता पिता बन्धु स्वजन । त्यांचें श्रवणीं पडतां न्यून ।
कळवळूनियां स्त्रियांचें मन। होवोनि उद्विग्न पतिभजनीं । तैसी नव्हेसि तूं रुक्मिणी । भवविरक्त जैसे ज्ञानी । ईषणात्यागें कैवल्यदानी । जाणोनि भजनीं अनुसरती । तैसेंचि तुझें निर्वाणभजन । माता पिता बन्धु स्वजन । सांडून जालीस मदेकशरण । तेंही संपूर्ण अवधारिं ।
हे मानिनी ! मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्नी दुसरी कोणीही दिसत नाही; कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून ब्राह्मणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठविला होतास.
Ad. देवदत्त परुळेकर








