तैपे
इकडे तैवानने अलीकडेच सैन्य ताफ्यात आधुनिक एफ-16 एस या लढाऊ विमानाला सामील करून घेतले असल्याचे समजते. त्यामुळे देशाच्या संरक्षण यंत्रणेला अधिक पाठबळ लाभलं आहे. शस्त्रास्त्राच्या बाबतीत अमेरिकेकडून तैवानला मदत होत असल्याची माहिती आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या सदरच्या नव्या एफ – 16 एस या विमानाचा वेग 2 हजार 414 किमी प्रति तास इतका असून 4 हजार 220 किमी टप्प्यापर्यंत हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता या विमानाची आहे. चीन आणि तैवानमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढतो आहे. या अनुषंगानेच तैवान सध्या शस्त्रसामग्रीसह सज्जता करण्याच्या तयारीत दिसतो आहे. चीन नेहमीच आपली लढाऊ विमाने तैवानच्या हवाई क्षेत्रात पाठवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ऑक्टोबरमध्ये चीनने तैवान हवाई क्षेत्रात 200 लढाऊ विमाने पाठवली होती, अशीही माहिती पुढे आली आहे.









