प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेत लाच स्वीकारणारे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह असलेले आरोग्य निरीक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव आणि राजेंद्र कायगुडे या तिघांना मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी निलंबित केले आहे. तर उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य संचालनालय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यांनी 8 जून रोजी लाच घेतली होती. 48 तास ते आपल्या सेवेत हजर न झाल्याने तीन आरोग्य निरीक्षकांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.