प्रतिनिधी / गोडोली
देगाव फाट्यावरील रहिमतपूर रस्त्यालगत अतिक्रमण करुन गेली १० वर्षे बांबू,प्लास्टिक कागद,फरशा घालून बसलेली भाजीमंडई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी शुक्रवार सकाळी उठवली. त्याचवेळी समर्थनगर ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलेल्या जागेवरील छत काढून टाकले.यावेळी फिरोजतात्या शेख यांनी सदरच्या विक्रेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मांजरे साहेब आले.त्यांनी आदेश दिला आणि अवघ्या अर्ध्या तासात १० वर्षाचा मंडई आणि अतिक्रमणाचा प्रश्न निकाली काढला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या देगाव फाट्यावरील मंडईतील विक्रेत्यांच्यावर सातारा पोलिसांनी थेट कारवाई केली. गेली १० वर्षे झाली रहिमतपूर रस्तालगत समर्थनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत हि मंडईत हळूहळू विक्रेत्यांची संख्या वाढली होती. अनेकांनी बांबू, प्लास्टिक, फरश्या घालून चांगले अतिक्रमण केले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि समर्थ नगर ग्रामपंचायतीने वेळोवेळी सांगून हि हे अतिक्रमण निघाले नाही.
मात्र शुक्रवारी सकाळी १०:३० ते ११ यावेळीत पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी १० वर्षाचे अतिक्रमणासह सर्व मंडई कायम स्वरूपी हटविण्यात आले. तत्काळ समर्थनगर ग्रामपंचायतींचे सदस्य फिरोजतात्या शेख, ग्रामसेविका मायणे यांनी अतिक्रमण काढून घेण्यासाठी विक्रेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.सर्वांनी ते शांततेत काढून घेतले.
Previous Articleचिंताजनक : औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 6243 वर
Next Article विस्तारवादाचे दिवस गेले, आता विकासवादाचे युग








