► वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवार, 27 ऑक्टोबर रोजी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझऊद्दीनसह 45 जणांना तिकिटे देण्यात आली आहेत. मोहम्मद अझऊद्दीन यांना हैदराबाद शहरातील जुबली हिल्स मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार मधु गौर यक्षी यांना लाल बहादूर नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तसेच पूजाला हरिकृष्णा यांना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याविरोधात सिद्धीपेट मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त काँग्रेसने मुनुगोडे येथून राजगोपाल रे•ाr, महबुबाबादमधून मुरली नाईक आणि अंबरपेटमधून रॉबिन रे•ाr यांना उमेदवारी दिली आहे. तेलंगणातील 119 पैकी 100 जागांवर पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.









