तेरे चेहरे में वो जादू है…
बुधवार. दि. 1 ते मंगळवार दि 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत
कुणालाही बघितल्या बरोबर जर तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव, सवयी, आर्थिक आणि सामाजिक स्थिती इत्यादी गोष्टींबद्दल कळले तर कसे वाटेल? या शास्त्राला मुखाकृती विज्ञान मुखसामुद्रिक असे म्हणतात.भारतीय ज्योतिष शास्त्राच्या अनेक शाखांपैकी एक शाखा म्हणजे सामुद्रिक शास्त्र. सामुद्रिक या या शब्दाची उत्पत्ती समुद्र(क) ऋषींपासून झाली म्हणजे समुद्रक ऋषींनी सामुद्रिक शास्त्राची उत्पत्ती केली असा एक मतप्रवाह आहे. यामध्ये हस्तसामुद्रिक ( पामेस्ट्री) , कपाल सामुद्रिक (प्रेनोलॉजी) , मुखसामुद्रिक असे जवळजवळ 600 प्रकार सामुद्रिक मध्ये समाविष्ट आहेत. समुद्र ऋषीं बरोबरच नारायण, हरिदास, नारद, वररुची, गर्ग, अगस्त्य इत्यादी ऋषींचेही सामुद्रिक शास्त्रात योगदान आहे. सेंट जर्मन, विल्यम हल्बर्ट शिल्डोन सारख्या पाश्चात्य लेखकांनी देखील सामुद्रिक शास्त्रावरती साहित्य लिहिले आहे. सनातन संस्कृती बरोबरच जैन आणि बौद्ध साहित्यात देखील सामुद्रिक शास्त्राचा उल्लेख आढळतो. महावीर तीर्थंकर यांच्या अंगलक्षणा बद्दल, बुद्धांच्य्ाा शरीरा वरील खुणां बद्दल देखील विवेचन आढळते. या लेखाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती ला पाहिल्या बरोबर प्राथमीक पण तंतोतंत माहिती तुम्हाला कळावी हा आहे. विस्तारपूर्वक लिहायला गेलो तर अख्ख पुस्तक लिहून होईल पण आपण मुख्य गोष्टींकडे लिखाण केंद्रित करूया. यात मुख्यतः चेहेरा, चेहेर्याचा आकार, कान आणि कानांचा आकार, नाकाचा आकार, चेहऱयावरील तीळ, डोळे यांचा कसा अर्थ काढायचा ज्याने समोरच्या माणसाचा ‘खरा चेहरा(!)’ आपल्यासमोर येईल हे शिकणार आहोत. सर्वात आधी चेहऱयाच्या आकारावर लक्ष केंद्रित करूया. चेहराचा आकार मुख्यतः गोल, लंब गोल, शंकूप्रमाणे किंवा संमिश्र असा असतो. ज्यांचा चेहरा गोल आहे अशा व्यक्ती मृदू आणि आनंदी स्वभावाच्या, पटकन राग येणाऱया आणि तितक्मयाच लवकर शांत होणाऱया असतात. बऱयाचदा यांचा जन्म मोठय़ा कुटुंबात किंवा सधन परिवारामध्ये झालेला असतो. काहीशी आळशी प्रवृत्ती, सुखासीन स्वभाव, आराम पसंद, कष्ट करायला कंटाळा करणाऱया, काहीशा भोळसट, कोणत्याही व्यक्तीवर सहज विश्वास करणाऱया आणि त्यामुळे फसविले जाणाऱया, मनमौजी अशा आढळतात. त्यातही हनुवटी लहान, गाल मोठे आणि डबल चिन असेल तर आयुष्यात यांना काही वेळेला मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागते. यांच्या वैवाहिक जीवनामध्ये एक तर सुरुवातीला किंवा आठ नऊ वर्षानंतर थोडा तणाव असलेला आढळतो. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत या काहीशा भाग्यवान सुद्धा असतात. यांचा मित्रपरिवार मोठा असतो. पार्टीला जाणे आणि पार्टी करणे यांना आवडते. मित्रांकडे जास्त लक्ष दिल्यामुळे त्यांचे कुटुंबीय काहीसे नाराज असतात. गुप्त गोष्टी यांना पचत नाहीत. अशा व्यक्ती हलक्मया कानाच्याही असू शकतात म्हणजे कोणीही काहीही सांगितले तर यांना लगेच पटते. लंबगोलाकार तोंडाच्या किंवा चेहऱयाच्या व्यक्ती या काहीशा सावध, पराक्रम करणाऱया, सतत काही तरी शोधत असलेल्या, पटकन विश्वास न ठेवणाऱया, एखाद्या गोष्टीचा शहनिशा अनेकदा करणाऱया, आपल्या भावना आणि विचार अशा व्यक्तींना योग्य शब्दात प्रेझेंट करता येत नाही किंवा मांडता येत नाही. काही वेळेला हेकेकोर, हट्टी स्वभाव असतो. नोकरी करत असतील तर यांचे बॉस यांच्यावर खुश असतात, कारण सांगेल ते काम आपले मत न व्यक्त करता करतात. याला कष्ट करणे आवडते पण बऱयाच वेळेला यांची दिशा चुकते. यांचा मित्रपरिवार सीमित असतो पण ओळखी खूप असतात. सरकारी कर्मचारी, वित्तीय संस्था किंवा फायनान्स मध्ये काम करणारे लोक, राजकीय पक्षाचे मेंबर वगैरे मंडळी यांच्या मित्र परिवारामध्ये असतात. (क्रमशः)
महा उपाय ः मिथुन राशीच्या लोकांकरता कवच आणि उपासनाः दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीच्या दुपारनंतर आणि कृष्ण पक्षातील वादशीच्या सकाळचे दुपार काळात शक्यतो जोडीदारासह कपिला गायीचे दर्शन घ्यावे. पूजा करावी. गोड खाऊ घालावे. एक दिवस परेल एका चारा दान द्यावा. श्री विष्णूची उपासना करावी
सोपी वास्तू टिप ः इशान्येला गंगाजलाची कुपी ठेवल्यास घरात शांतता राहाते, बरकत येते
मेषः
येणाऱया काळामध्ये तुमच्या मनात कलुषित विचार येऊ शकतात. कुणालाही कसलेही वचन देताना ( शाब्दकि किंवा लेखी) सावध राहण्याची गरज आहे. धनस्थानी होणारा लक्ष्मी योग उत्तम धनप्राप्तीचे संकेत देत आहे. प्रवासाचे योग आहे आणि प्रवासामुळे भाग्योदय होण्याची शक्मयता आहे. मातृतुल्य व्यक्तीच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. गुंतवणुकीतून लाभ जरी होत असला तरी सारासार विचार करावा. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्ती होईल. उपाय
मारुतीला शेंदूर अर्पण करावा
वृषभः
साहस आणि धैर्य यांच्यात वाढ होईल. कामे आत्मविश्वासाने कराल. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे लागेल. काही प्रसंगात मन हळवे होऊ शकते. धनप्राप्ती करता संघर्ष करावा लागेल. कौटुंबिक जबाबदाऱया वाढतील. कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीच्या तऱहेवाईक वागण्याचा त्रास होऊ शकतो. प्रवासातून आर्थिक लाभाचे संकेत जरी असले तरी दुखापतीची शक्मयता आहे. प्रेम संबंधांमुळे मानसिक त्रास होईल. मन धार्मिकतेकडे वळेल. उपाय
देवीला गुलाबाचे फुल आणि कापूर अर्पण करावा
मिथुनः
नको त्या गोष्टींवर खर्च करण्यापासून स्वतःला थांबवावे लागेल. तब्येत नाजूक असेल. काही पेच प्रसंगांमध्ये बुद्धी चातुर्याने मार्ग काढाल. धनप्राप्तीच्या नवीन संधी प्राप्त होतील पण तुम्ही त्याचा किती फायदा उचलता हे महत्त्वाचे ठरेल. लहान मोठय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. पितृतुल्य व्यक्तीची साथ मिळेल. नोकरदार वर्गाने कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, इतर गोष्टींकडे लक्ष दिल्यास नुकसान होण्याची शक्मयता आहे. उपाय उजव्या
मनगटावर हिरवा धागा बांधावा
कर्कः
तुम्ही बोलाल त्याचा वेगळाच अर्थ समोरची व्यक्ती काढू शकते. Aत्यामुळे बोलत असताना योग्य त्या शब्दांचाच वापर करावा. तब्येतीचा पाया कमजोर असेल. धनप्राप्ती करता अनुकूल ग्रहमान आहे. सासरच्या लोकांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करावी लागेल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. लेखी कामांमध्ये यश मिळेल. भावंडांची किंवा शेजाऱयांची योग्य वेळी साथ मिळेल. नोकरदार वर्गाला येणारा काळ उत्तम असेल.
उपाय ः झोपताना डोक्या शेजारी पाणी ठेवून सकाळी झाडांना घालावे
सिंहः
आरोग्याला हरप्रकारे जपावे लागेल. कोणताही आजार अंगावर काढू नका. वैद्यकीय मदतीने आजारावर मात कराल. भावंडांना शारीरिक किंवा मानसिक त्रास संभवतो. जोडीदाराच्या अहंमान्य स्वभावामुळे चिडचिड होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणाऱयांना अडचणींचा सामना करावा लागेल असे दिसते. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. नोकरदार वर्गाला थोडे कष्ट असतील.
उपाय ः संतांच्या मंदिराला भेट द्यावी
कन्याः
तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नाही. धनप्राप्तीसाठी कुटुंबीयांची मदत घ्यावी लागेल. घरातील सदस्यांबरोबर एखाद्या समारंभाला जाऊ शकता. मत्वाच्या विषयावर नातेवाईकांशी चर्चा कराल. कामाच्या निमित्ताने प्रवास करत असाल तर तेथील धार्मिक स्थळाला आवश्यक भेट द्या, फायदा होईल. स्थावर मालमत्तेविषयी प्रश्न असतील तर त्यांची योग्य ती उत्तरे मिळतील. नवीन प्रॉपर्टी घेण्याचे योग आहेत.
उपाय ः गाईला हिरवा चारा घालावा
तुळः
स्वभावामध्ये थोडीशी डिटॅचमेंट म्हणजे विरक्ती येण्याची शक्मयता आहे. या काळात अध्यात्माकडे रस असेल. प्रवासाचे प्रबळ योग होत आहेत. हा प्रवास कामानिमित्त किंवा व्यापारा निमित्त होऊ शकतो. सगळी कामे पटापट पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल. जे लोक संतती करता प्रयत्न करत आहेत त्यांना शुभ वार्ता कळू शकते. प्रेम प्रसंगामध्ये निराशा पदरी पडेल. या काळात वैवाहिक जोडीदाराकडे विशेष लक्ष द्याल. उपाय
गाईच्या पायाखालची माती पिवळय़ा कागदात बांधून जवळ ठेवावी
वृश्चिकः
जोडीदारामुळे आर्थिक लाभाची शक्मयता आहे. जे विवाह करता प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरी करणाऱयांनी आपल्या हातून कोणतीही चूक करणार नाही याची विशेष काळजी घ्यावी कारण वरि÷ांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. गुप्त शत्रूंवर मात कराल. रोगराई दूर होतील. हाताखालील लोकांचा त्रास होऊ शकतो. प्रेम प्रसंगात अपमान कारक प्रसंग घडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. उपाय ः बजरंग बाण स्तोत्राचा पाठ करावा
धनुः
बुद्धीचा सूर्याच्या बळावर प्रसंगांवर मात कराल. मागील काळात अनुभवलेल्या अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. वाणीमध्ये एक प्रकारची कठोरता येऊ शकते ज्याने नातेसंबंध बिघडू शकतात. आरोग्य उत्तम असले तरी योग्य ती काळजी घ्यावीच लागेल. प्रवास शक्मयतो टाळा. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. वाहन घेण्याचा विचार करत असाल तर अनुकूल काळ आहे. शेअर बाजारापासून कटाक्षाने दूर राहा.
उपाय ः कामाला निघताना गोड खाऊन निघावे
मकरः
हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. व्यवसायिक प्रगतीचे ग्रहमान आहेत. इतके असून सुद्धा मनात निगेटिव्ह विचार येण्याची शक्मयता आहे. तब्येतीची योग्य ती काळजी घेतली नाही तर आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. आर्थिक बाजू चांगली असेल. कौटुंबिक वातावरणात मधुरता येईल. खर्च मात्र वाढणार आहे. मित्रांकडून हवा तसा प्रतिसाद मिळणे अवघड दिसते. मानसन्मानाची प्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाला समजून घ्या.
उपाय ः गुळाचे दान द्यावे
कुंभः
आरोग्य सुधारेल. पैशांच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबीयांसोबत एखाद्या मंगल समारंभात भाग घ्याल. प्रवास शक्मयतो टाळावा. कागदपत्रे सांभाळण्याची गरज आहे. कोणाशीही पत्र व्यवहार किंवा लेखी व्यवहार करत असताना योग्य शब्दांचाच वापर करावा. शेअर बाजारासारख्या जोखीम असणाऱया कार्यात पैसे गुंतवू नका. नोकरीत ताणतणावाची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात जबाबदारी वाढल्याने चिडचिड होईल.
उपाय ः चंदनाचा टिळा लावावा
मीन
आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ असला तरी पैशाच्या दृष्टीने कष्टाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. कौटुंबिक वाद विवादापासून दूर राहा. नोकरदार वर्गाला अधिकारी वर्गाची योग्य ती साथ मिळेलच असे सांगता येत नाही. प्रवासातून फायद्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टी विषयक कामांना थोडे पुढे ढकलावे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे. लहान मोठय़ा अपघातापासून सावध राहा. तुमच्या कामांचे समाजामध्ये कौतुक होईल.
उपाय ः मंदिरात तुपाचे दान द्यावे





