हलकर्णी प्रतिनिधी
तेरणी येथील कल्लाप्पा हल्लाप्पा धनगर (वय 19) यांने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची वर्दी चुलते गोपाल बिशपा धनगर यांनी पोलीसात दिली. सदर घटनेची हलकर्णी पोलीसात नोंद झाली आहे.
अधिक माहिती अशी की, गोपाल बिरापा धनगर व मृत कल्लाप्पा हल्लाप्पा धनगर हे नात्याने चुलते-पुतण्या असून ते गावात विभक्त रहात आहेत. मृत कल्लाप्पा धनगर यांने कोणत्या तरी मानसिक तणावातून त्याच्या राहत्या घरी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता छतास असलेल्या लोखंडी अँगलला दोरी बाधून गळफास लावून घेवून आत्महत्या केली.