गेल्या आठवडय़ात निफ्टीने तुलनेत 1.52 टक्क्मयांनी तेजी दर्शवली तर सेन्सेक्समध्ये 1.59 टक्क्मयांची तेजी दर्शवली गेली. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळातही शेअरबाजार तेजीचा कल दर्शवत आहे. पण मुद्दा असा आहे की हा कल कायम राहणार आहे का?
गेल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअरबाजारात थोडीशी घसरण झाली. सेन्सेक्स 143 अंकांनी आणि निफ्टी 45 अंकांनी घसरला. पण गेल्या संपूर्ण आठवडय़ाचा विचार केला तर शेअरबाजारात तेजीचाच कल दर्शवला गेला. देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यामुळे एकूणच अनिश्चितता वाढली आहे. तरीही शेअरबाजारात आठवडय़ाभरात तेजीचा कल दिसून आला. मध्यम आणि लहान कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक झाल्याचे दिसून आले.
बीएसईत जवळजवळ 46 स्टॉक्स दहा ते तीस टक्क्मयांनी गेल्या आठवडय़ात वाढले. त्यात एनसीसी, जीई पॉवर, जिंदाल स्टील अँड पॉवर, इंडसइंड बँक, इक्वटिस होल्डींग्ज, कर्नाटक बँक, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक वगैरेंचा समावेश आहे.
थोडक्मयात सगळीकडे अस्थिरता असतानाही शेअर मार्केट हळूहळू तेजी दर्शवत आहे, हा कल कायम राहील का याकडे आता सगळय़ांचे लक्ष आहे. एका बाजूने विचार केला तर शेअरबाजार लोभ आणि भीती या दोन भावनांच्या हिंदोळय़ावर हेलकावे खातो आहे. एका बाजूला हळूहळू आर्थिक परिस्थिती रूळावर येईल ही आशा आहे तर दुसऱया बाजूला कोविड रूग्णांची संख्या सातत्याने वाढताना पाहून चिंता वाटत आहे. लॉकडाऊनसारख्या कठीण परिस्थितीचा सामना बाजाराने केला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक स्थितीकडेही त्याचे लक्ष आहे. या दोन गोष्टींमुळे शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांचा कल जास्तीत जास्त नफा मिळवण्याकडे आहे. म्हणूनच शेअर बाजार वाढायला लागला की फायदा मिळवण्यासाठी विक्री होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत सावध राहूनच शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.
आजपासून सुरू होणाऱया आठवडय़ात सुरुवातीला गुंतवणूकदार ढोबळ आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील आणि मग ते कंपन्यांचे आर्थिक परिणाम विचारात घेतील. अर्थात जगभरात आणि देशात कोविड-19 च्या स्थितीत काय फरक पडतो आहे याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असणारच आहे.
आर्थिक आघाडीचा विचार केला तर देशाची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. जागतिक बाजारांतही उत्साहाचेच वातावरण आहे. आत्मनिर्भर भारतच्या घोषणेने देशातील विशेषत: तरूणांमध्ये उत्साह आहे आणि काहीतरी करून दाखवण्याच्या धडपडीत हे तरूण आहेत. अर्थात रूग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. आणि त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होत आहे.
या आठवडय़ातही निफ्टी तेजीचा कल दर्शवत आहे. साहजिकच त्यामुळे खरेदीसाठीची मागणी वाढत आहे. पण गेल्या आठवडय़ात बाजारातील व्यापाराची मर्यादा आकुंचित झाली होती. म्हणजे बाजारात काहीशी मरगळ येते की काय असे वाटत होते. या आठवडय़ात ही मरगळ अनुभवायला येऊ शकते.
निर्देशांक तेजीचाच कल दिसत असला तरी सध्याच्या स्तरावर काहीशी मरगळ दिसत आहे. या आठवडय़ात शेअर बाजारात अस्थिरता तर राहीलच पण निरूत्साहही असेल. आठवडय़ाच्या सुरूवातीला निफ्टीत घसरण दिसेल. निफ्टी 19531 ते 10676 या मर्यादेपर्यंत खाली येईल आणि आठवडय़ाच्या उत्तरार्धात त्याच्यात मोठय़ा प्रमाणावर सुधारणा होईल. म्हणूनच घसरणीच्या काळात खरेदी करणे आणि तेजीच्या काळात विकणे हेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल.
येत्या तीन ते चार आठवडय़ांसाठी खालील तीन महत्वाच्या शेअर्सची खरेदी करावी.
सिमेन्स – सध्या 1147 रुपये दर सुरू आहे. 1340 रूपयांपर्यंत तो चढेल अशी अपेक्षा आहे.
दिवीज लॅबोरेटरीज – सध्या 2176 रुपये दर आहे, तो 2410 रूपयांपर्यंत जाऊ शकतो.
एसीसी – सध्या 1345 रुपये दर आहे, तो 1180 पर्यंत खाली येऊ शकतो. त्याची विक्री करावी.
– संदीप पाटील,
शेअरबाजार अभ्यासक









