रात्री तीन वाजता लालगढमध्ये कारवाई
बंगालच्या तप्त राजकीय वातावरणादरम्यान एनआयएने माओवाद्यापासून तृणमूल काँग्रेसचा नेता झालेल्या छत्रधर महतोला अटक केली आहे. एनआयएने शनिवारी रात्री उशिरा लालगढ येथील घरातूनच त्याला अटक करण्यात आली आहे. महतोला भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेसचे अपहरण करण्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
बंगाल निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांना यामुळे आणखी एक झटका बसला आहे. पूर्वाश्रमीचा माओवादी असणारा आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील छत्रधर महतो याला अटक झाली आहे. यापूर्वीही महतोला एनआयएने अटक केली होती. पण 10 वर्षे तुरुंगात राहिल्यावर मागील वर्षी फेब्रुवारीत मुक्तता झाल्यानंतर महतोने माओवादाचा मार्ग सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.









