सलग आठव्या वर्षी वेताळ प्रतिष्ठान, तुळसचे आयोजन
तुळस / वार्ताहर:
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने सलग आठव्या वर्षी युवक दिनाचे औचित्य साधून रविवार दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील श्रीदेव जैतिराश्रित संस्थचे संस्थापक कै. रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृह येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा खुल्या व शालेय मोठा गट व लहान गट अशा एकूण तीन गटात आयोजित केली आहे.
सामाजिक मूल्यांचे अवमूल्यन अजूनही राजरोस होत असून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, बलत्कारासारखी घटना अत्यंत वेदनादायक अशीच आहे. अशा घटनेनंतर सामाजिक प्रतिक्रिया उमटत राहतात. पण अशा पिडीत महिलेचे पूर्ण आयुष्य उध्वस्त होते. अशा अमानवी कृत्यानंतर अशी स्त्री कसे जीवन जगत असेल? तिच्या मानाचा गुंता ती कसा सोडवत असेल? समाज म्हणून आपली जबाबदार काय? अशा विषयावर विचारमंथन करण्यासाठी खुल्या गटासाठी निर्भया आणि नंतर' असा वकृत्व स्पर्धेचा विषय आहे. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे भारताच्या अवकाश आणि संशोधन क्षेत्रात भरीव असे योगदान आहे. विद्यार्थी प्रिय अशा या व्यक्तिमतावर प्रकाश टाकण्यासाठी शालेय मोठा गट (आठवी ते दहावी) साठीमला समजलेले अब्दुल कलाम’ असा वकृत्व चा विषय आहे. तर शालेय लहान गट (सातवी पर्यंत) साठी `आई-वडील माझे दैवत’ असा वकृत्व चा विषय आहे.
खुल्या गटासाठी किमान 8 मिनीट तर कमाल 10 मिनीट वेळ तर शालेय गटासाठी किमान 5 मिनीट व कमाल 7 मिनीट एवढा सादरीकरणाचा वेळ आहे. या स्पर्धेतील खुला गट प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रू. 1000, 700, 500 आणिr चषक व प्रमाणपत्र तर शालेय मोठया गटासाठी अनुक्रमे रू. रू. 777, 555, 333 आणि चषक व प्रमाणपत्र तर शालेय लहान गटासाठी अनुक्रमे रू, 555, 444, 333 आणि चषक व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. शालेय स्पर्धकांनी शाळेचे शिफारसपत्र आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे सहसचिव गुरुदास तिरोडकर -9420747268 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.









