प्रतिनिधी /पणजी
दिवाळी उत्सवानंतर आता ऐन तुळशीविवाह उत्सवावर देखील पावसाचे पाणी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दि. 16 नोव्हेंबरपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला असून येलो अलर्ट जाहीर केला आहे.
तामिळनाडूतील कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम म्हणून पावसाचे ढग गोव्यावर पोहोचले आहेत. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ होते व पाऊस पडणर अशीच चिन्हे दिसत होती. मात्र संध्याकाळपर्यंत पाऊस पडला नव्हता. आजही राज्यात वातावरण ढगाळ राहील व संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दि. 15 नोव्हेंबरपासून राज्यात तुळशीविवाह सोहळय़ाला प्रारंभ होत असून या उत्सवावर देखील पावसाचे संकट आलेले आहे.









