पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी : तुळजापूर
येथील दोन तरुणांकडे गावठी पिस्तुल सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोघांनाही तुळजापूर पोलिसांनी अटक केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजेंद्र सुरेंद्र कांबळे (वय 21, रा. खंडाळा) आणि एक अल्पवयीन तरूण अशा या दोन तरुणांकडे गावठी पिस्तुल सापडले आहे. दोघांनाही तुळजापूर पोलिसांनी अटक केली.
तुळजापूरच्या पाचुंदा तलावाजवळ दोन तरुणांकडे गावठी पिस्तुल असल्याची गुफ्त माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाचुंदा तलावाकडे पंचासह जाऊन झडती घेतली. तेव्हा या दोघांकडे गावठी पिस्तुल आढळून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच या दोघांनी तुळजापूर येथे गावठी पिस्तुल विक्री केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.









