उचगावः तुरमुरी ते कोनेवाडी या जवळपास तीन कि.मी. अंतराच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. सदर खड्डे गावातील युवकांनी पुढाकार घेऊन सर्व खड्डे श्रमदानातून बुजविल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱया प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाच्या जोरदार माऱयाने या रस्त्यावर खड्डे पडले होते. या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी प्रवास करणे धोकादायक होते. खड्डय़ात वाहने गेल्याने नादुरुस्त झाल्याच्या घटनाही घडत होत्या. याची जाणीव कोनेवाडी गावातील युवकांना होताच युवकांनी श्रमदानातून हे खड्डे बुजविले. सार्वजनिक बांधकाम खात्याने तसेच लोकप्रतिनिधींनी निधी मंजूर करून रस्त्याचे काम हाती घ्यावे, असे नागरिक व युवक मंडळांनी विनंती केली आहे. यामध्ये अशोक भातकांडे, मनोहर भातकांडे, महेश तुप्पटकर, विशाल पाटील, पुंडलिक किटवाडकर, ओंकार बेनके, बबलू पाटील, अनिल पाटील आदिंनी घेतला.









