ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवं. कामगिरीवर असताना राष्ट्रहीत कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक असल्याचा कानमंत्र दिला.
लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे. कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती. कारण पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. मात्र लोकांच्या मनातील ही धारणा पुन्हा नकारात्मक झाली आहे. पोलीस दलात येणाऱ्या नव्या पिढीची ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.
पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात. सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते असेही ते म्हणाले.
Previous Articleविहिंपतर्फे पूरग्रस्तांसह गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
Next Article नागठाणेत युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न









