नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांबद्दची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून राज्यात ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात झाली आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जन आशीर्वाद यात्रा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येतं का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे, असा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.
यावेळी माध्यमांसी संवाद साधतान संजय राऊत म्हणाले की,कोरोनाच्या संकाटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल सर्वच बाबतीच सावधगिरीने पावलं टाकून त्यांचं काम सुरू आहे. त्यामुळे, देशाचं लक्ष त्यांच्या कामगिरीकडे लागलं आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, घरी बसून टॉप 5 मध्ये येता येतं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाऊनकाळात प्रत्येकाने वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. कारण नसताना तुम्ही लोकं उकिरडे फुंकत फिरलात. आता जी काही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहिती आहे. सध्या ज्या प्रकारे गर्दीचं नियोजन करताय शक्ती प्रदर्शनासाठी हे एकप्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. राज्याच्या मुखअयमंत्र्यांनी इशारा दिला आहे. पण हे मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्यासाी करत आहे पण ठिक आहे काही अडचण नाही. पण तुम्ही किमान संयम पाळा एवढंच मला म्हणायचं आहे.
उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉप टेन आणि टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. आता ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. लवकरच ते टॉप वन होतील. आमचे राजकीय विरोधक काहीही म्हणून द्या. ते म्हणतील हा कसला पोल? असा पोल असतो का? ते काहीही म्हणून द्या. जेव्हा तुमच्याबाबतीत पोल येत होते, तेव्हा तुम्ही त्याचे ढोल आणि झांजा वाजवत होता. आता आम्हीही फटाके फोडू. आमचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आणि गर्व वाटावं असं नेतृत्व आहे. त्यांचं काम उत्तम चालू आहे. विकासाचं आणि कोरोना नियंत्रणाचं काम चांगलं चालू आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








