बुधवार दि.24 मार्च ते मंगळवार दि. 30 मार्च 2021
प्रीति षडाष्टक व मृत्यू षडाष्टक,या बाबतचे असलेले गैरसमज
पूर्वार्ध
लग्न ठरविताना विवाहघटित अथवा गुणमिलनाच्यावेळी गुणनाडी, योनी व मंगळदोष यासह 120 तऱहेने वधूवरांच्या पत्रिका तपासण्याचा प्रघात आहे. हल्लीच्या काळात केवळ चार-पाच मुद्दे तपासून लग्न ठरवले जाते. त्यामुळेच बहुतांश संसार बिघडलेले दिसून येतात. या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यू षडाष्टक योग! पण नावाप्रमाणे हा योग इतका वाईट नसतो. मृत्यूसम वैचारिक पीडा असा त्याचा अर्थ आहे. पण हा योग दिसला की, पत्रिका बाजूला सारली जाते. या योगाला तारक असे अनेक पर्याय कुंडलीत असतात. काही मृत्यू षडाष्टक योग विचारात घेऊ नयेत असेही पूर्वीच्या काही ग्रंथात लिहिलेले आहे. उदाहरणार्थ तूळ व मीन या राशींना मृत्यू षडाष्टक धोकादायक नसतो. मुख्यतः षडाष्टक म्हणजे काय हेच लोकांना माहीत नसते. त्यामुळे वरवर कुंडली पाहून मृत्यू षडाष्टक एकनाडी व मंगळदोष आहे. लग्न करू नका. मृत्यूषडाष्टक योगामुळे पती किंवा पत्नी कोणाचातरी मृत्यू होतो, अशी भीतीही घातली जाते. पण ते सर्वस्वी चुकीचे आहे. सर्वच योग कधीही वाईट नसतात. पण त्यामागे कारण काय असावे याची शहानिशा मात्र कुणीही करीत नाहीत. उदाहरणार्थ गुरुपुष्यामृत योगावर विवाह करू नये असे म्हणतात. पण अशा योगावर विवाह केलेल्यांना कोणताही त्रास झालेला नाही. ते सर्व दृष्टीने सुखी, ऐश्वर्यसंपन्न आहेत असे दिसून आले आहे. त्यामुळे केवळ ग्रंथात लिहिले आहे म्हणून ते सांगणे योग्य नाही. आपण स्वतः देखील त्याचा सर्व दृष्टीने अभ्यास करून निर्णय घेणे योग्य ठरते. ज्योतिषशास्त्रामध्ये जिवावरचे प्रसंग केव्हा येतात आणि मानसिक आघात केव्हा होतात व ते कसे पहावे याचे स्पष्ट आडाखे दिलेले असतात. कन्या आणि मकर राशीतील शुक्र बिघडला तर वर्तन बिघडते असा नियम आहे. पण काही वेळा अशी मुले-मुली देखील चारित्र्याने अत्यंत पवित्र असलेली दिसून आलेली आहेत. ग्रहमान सर्व दृष्टीने उत्तम असून देखील मुले-मुली बिघडलेली आढळतात. गुरुपुष्यामृत योगावर तसेच उच्च गुरुवर जन्म घेऊन देखील गरिबीत दिवस काढणारे लोक आम्ही पाहिलेले आहेत. मृत्यू षडाष्टक हा स्वभावाशी संबंधित मुद्दा आहे हे लक्षात घ्यावे. या षडाष्टकावर प्रचंड माहिती मिळू शकते व त्याचा उपयोग कसा करावा हे देखील समजू शकते, पण त्यासाठी जिद्द व अभ्यासू वृत्ती मात्र हवी.
मेष
होलाष्टकाचा प्रभाव सुरू आहे. अनिवार्य असेल तरच अत्यंत महत्त्वाची कामे हाती घ्या. होळी पौर्णिमा व करिदिनादिवशी काही जुनी प्रकरणे बाहेर येतील. यातून वाद होण्याची शक्मयता आहे. शक्मयतो नमते घेऊन प्रकरणे मिटवावित. अतिदूरवरचे प्रवास टाळावे. प्रचंड गर्दीची ठिकाणे, तसेच महाप्रसादाची स्थळे वगैरे कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. किमती वस्तूंचे प्रदर्शन चुकूनही करू नका. आर्थिक व्यवहार, वैवाहिक जीवन, नोकरीव्यवसाय याबाबतीत अनुकूल योग दिसतात.
वृषभ
ग्रहमान म्हणावे तितके चांगले नाही. कोठेही आर्थिक गुंतवणूक करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारातून गैरसमज, मतभेद व गोंधळ निर्माण होईल. अचानक फायदा दिसत असताना काही बाबी नुकसानकारक ठरू शकतील. हाती घेतलेले प्रत्येक काम होईलच या भ्रमात राहू नका. पूर्वीचे जुने व्यवहार शक्मयतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, नक्की यश मिळेल. विद्यार्थ्यांनी खेळाकडे विशेष लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
मिथुन
महत्त्वाची कामे खोळंबल्याने मानसिक समाधान डळमळीत होईल. होळीचा अशुभ काळ सुरू होत आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतील. आरोग्य जपावे लागेल. रंगपंचमी नंतर बऱयाच अडचणी कमी होऊ लागतील. हाती पैसा टिकू लागेल. जर कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते परत मिळू शकतात. कोर्टमॅटर व तत्सम महत्त्वाच्या प्रकरणात कागदपत्रावर सही करताना मॅटर पूर्ण वाचून घ्या. किरकोळ दुर्लक्ष पुढे गंभीर उत्पात घडविल.
कर्क
गैरसमज निर्माण करणारे विचित्र ग्रहमान आहे. या सप्ताहात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजीपूर्वक वागावे. आर्थिक बाबतीत लाभदायक .वास्तु आणि व्यवसाय या बाबतीत करारमदार करणार असाल तर ते व्यवहार काही काळ पुढे ढकलणे योग्य ठरेल. एखादी वस्तू आवडली म्हणून घेण्यापेक्षा तिची गरज काय आहे याकडे विशेष लक्ष द्या. म्हणजे आर्थिक हानी होणार नाही.
सिंह
नोकरी, व्यवसाय, घरगुती बाबी, कौटुंबिक जीवन, मित्रमंडळी यावर परिणाम करणारे ग्रहमान आहे. वरि÷ांच्या जाचांमुळे असलेली नोकरी सोडण्याचा विचार कराल, पण घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कारण सध्या होलाअष्टकाचा अशुभ कालखंड सुरू आहे. आपली बाजू कितीही बरोबर असली तरी विचित्र ग्रहमान यामुळे निर्णय चुकू शकतात. पंचमीपर्यंत हा कालखंड राहणार आहे तोपर्यंत सर्व कामे काळजीपूर्वक करा.
कन्या
शेती, जागेचा व्यवहार, शिक्षण, विवाह, देणीघेणी या दृष्टीने ग्रहमान उत्तम आहे. पण होळीचा अशुभ कालखंड सुरू असल्याने सावधानता बाळगा. पैसा कमवण्यापेक्षा राखून ठेवणे महत्त्वाचे आहे, हे आठवडाभरात समजेल. कमाई आणि खर्च यांचे गणित व्यवस्थित ठेवा. त्यामुळे आपले चुकते कुठे याच्या तुम्हाला अंदाज लागेल व त्यानुसार पुढील आयुष्याची रूपरेषा आखता येईल. पुढील दोन-तीन महिन्यात अत्यंत महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. न्नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक जीवन, आर्थिक स्थिती यापैकी एका क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसून येईल.
तूळ
गाडी चालवणाऱयाला आपल्या चुका कळत नसतात पण, दुसऱयाने सांगितल्यास त्यात वाईटपणा न धरता त्या चुका सुधारता येतील का ते पहा. नोकरी आणि विवाहासाठी लवकरच अनुकूल काळ सुरू होत आहे. त्यामुळे घाई गडबड वाढेल. ठरवलेली सर्व कामे वेळेवर होणार नाहीत. आरोग्याच्या बाबतीत उत्तम काळ. जागेचे व्यवहार जर रखडले असतील यापुढे आगामी दोन-तीन महिन्यांचा कालखंड अतिशय उत्तम आहे. या काळात ती कामे पूर्ण करून घ्या.
वृश्चिक
आरोग्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैवाहिक जीवन, प्रवास इत्यादी बाबींवर दूरगामी परिणाम झालेले दिसून येतील. ग्रहमान चांगले, तरी काही बाबतीत त्रासदायक अनुभव देखील येऊ शकतात. त्यामुळे वादावादी, मतभेद, संघर्ष यांना थारा न देता स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. त्याचा निश्चितच फायदा होईल. घरातील अडगळ अथवा नको त्या वस्तू बाहेर काढताना अत्यंत महत्त्वाच्या वस्तू बाहेर जाण्याची शक्मयता आहे. काळजी घ्यावी.
धनु
एकाच वेळी दोन-तीन चांगल्या नोकऱयांचे कॉल येतील. अशावेळी पुढील भवितव्याचा विचार करूनच ती नोकरी स्वीकारा. विवाह विषयक काही बाबी अचानक अडचणी निर्माण करतील. त्यामुळे कोठेही गाफील राहू नका. तसेच कुणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतः वैयक्तिकरित्या विचार करून निर्णय घ्या. जुने वाहन वगैरे घेण्याचा योग येईल, पण पूर्ण माहिती काढून निर्णय घ्या अन्यथा फसवणूक होईल.
मकर
आपण व्यवस्थित चालत असलो तरी समोरून येणारी व्यक्ती कशी असेल सांगता येत नाही, याचा अनुभव या आठवडय़ात येईल. किरकोळ अपघात, गंडांतर, शत्रुत्व, मानहानी व गैरसमज यातून जावे लागेल. पण मनाने खंबीर असाल तर तसेच तुमची बाजू योग्य असेल तर काहीही त्रास होणार नाही. व्यवसायाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. कोर्ट प्रकरणे, धनलाभ, आरोग्य याबाबतीत चांगली प्रगती झालेली दिसून येईल. आर्थिक प्रश्न सुटतील. अडलेल्या विवाहाच्या वाटाघाटी पुन्हा सुरू होतील.
कुंभ
नोकरी, लिखाण, प्रवास, थोरामोठय़ांच्या ओळखी, महत्त्वाच्या वाटाघाटी याबाबतीत ग्रहमान उत्तम आहे. पण साडेसातीच्या प्रभावामुळे तुम्ही कोणताही ठाम निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे महत्त्वाची मोठी कामे करताना वडीलधाऱयांचा सल्ला अवश्य घ्या आणि योग्य नियोजन करूनच कामे करा, म्हणजे अनिष्ट ग्रहस्थितीचा काहीही परिणाम होणार नाही. होलाअष्टकाचा अशुभ प्रभाव सुरू आहे. त्यामुळे विनाकारण संघर्ष होऊ शकतात.
मीन
तुमचे प्रयत्न जर योग्य मार्गाने सुरू असतील तर तुमची प्रगती कुणीहि रोखू शकणार नाही. काही बाबतीत ग्रहमान अनिष्ट असले तरी महत्त्वाच्या कामावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पै-पाहुण्यांच्या वर्दळीमुळे किमती सामानांची हरवाहरवी अथवा अदलाबदल होण्याची शक्मयता दिसते. लग्नाच्या वाटाघाटी सुरु असतील तर इतरांना त्यात हस्तक्षेप करू देऊ नका. निष्कारण गैरसमज होऊ शकतात. घरातील झाडे वगैरे तोडताना अपघातापासून जपावे.









