बेंगळूर : तुमकूर जिल्हय़ातील पळवल्लीकट्टे (ता. पावगड) येथे शनिवारी सकाळी 9 वाजता खासगी बस कलंडून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी प्रवाशांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देणार असल्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री अरग ज्ञानेंद्र पुढे म्हणाले, खासगी बस अपघातातील जखमींना योग्य उपचार देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. पावगड रुग्णालयासह जखमींना अधिक उपचारासाठी तुमकूर, बेंगळूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी सांगितल्यानुसार जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे. तसेच अपघातात मृत झालेल्यांच्या वारसांना 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









