प्रतिनिधी / कुर्डुवाडी
तूप विकण्याचा बहाना करुन महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात दोन चोरट्यांनी लांबविले. ही घटना दि. ८ रोजी सकाळी १० वा. सुमारास येथील जैन मंदिर परिसरात घडली. प्रमिला विलास पाठक यांनी कुर्डुवाडी पोलिसांत याची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अज्ञात दोन इसमांनी घराबाहेर येऊन आम्ही शेंद्रीचे आहोत. तुमच्या मुलाने तूप पाठवले आहे . ते घेण्यासाठी या असा आवाज आल्याने फिर्यादी तुपासाठी भांडे घेऊन बाहेर आल्या. तूप घेतल्यानंतर त्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील गंठण खूप छान आहे.माझ्या भावाचे लग्न आहे. तुमच्या दुकानातूनच आम्हाला गंठण करायचे आहे.तरी तुमच्या गळ्यातील गंठण काढून दाखवा. त्यावेळी फिर्यादीने ते गंठण काढून दिले व तुपाचे पैसे आणण्याकरीता घरात जाऊन बाहेर येईतोपर्यंत त्या अज्ञात दोन चोरट्यांनी गंठण घेऊन पलायन केले. प्रमिला पाठक यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









