प्रतिनिधी / लोणंद
तुप, चिक देण्याचा बहाणा करुन चोरी करणाऱ्या आरोपीस लोणंद पोलीसांनी पकडले. दिनांक 7.02.2022 रोजी तुम्हाला तुप देण्यासाठी आप्पांनी पाठविले आहे. तुम्ही मला ओळखले नाही का, असा बहाणा करुन फिर्यादीस बोलण्यास गुंतवून त्याचेकडील 30,000 रुपये रोख रक्कम हात चलाखीने चोरुन नेण्याची घटना लोणंद येथे घडली होती. त्यानुसार मिळाले माहितीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या अनुषंगाने सहा पोलीस निरीक्षक विशाल के,वायकर व पोलीस प्रणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सीसीटिव्ही व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीचा शोध सुरु ठेवुन सदर आरोपीचा सीसीटिव्हीचे आधारे शोध घेवुन आरोपी अनिल रघुनाथ विरदबडे रा.गुणवडी ता.बारामती जि.पुणे हा असल्याचे निष्पण करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरलेली रोख रक्कम 30,000 रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हो जप्त करण्यात आली आहे.









