सातजण जखमी : करडीगुद्दी येथे पूर्ववैमनस्यातून घडली घटना : मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-बागलकोट रोडवरील करडीगुद्दीजवळ असलेल्या कॅम्बेल स्टोअर्ससमोर गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी तलवार हल्ला झाल्याने मुदकाप्पा चंद्राप्पा अंगडी (वय 25, रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल) याचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
बेळगाव-बागलकोट रोडवरील करडीगुद्दीजवळ असलेल्या कॅम्बेल स्टोअर्ससमोर एक लग्न होते. त्या लग्न समारंभामध्ये करडीगुद्दी आणि मारिहाळ येथील नातेवाईक उपस्थित होते. यावेळी बेळगावहून मुदकाप्पा आणि सुतगट्टी, मल्लापूर गावातील नागरिक बोलेरो क्रमांक केए 28 बी 1273 मधून सुनकुप्पीकडे जात होते. त्यावेळी कॅम्बेल स्टोअर्सजवळ लग्न समारंभामध्ये मुदकाप्पाचे काहीजण ओळखीचे दिसले. त्यामुळे मुदकाप्पाने बोलेरो थांबविली. यावेळी तो काही जणांशी बोलत थांबला होता. त्याचवेळी एकाने याच्याशी काय बोलतोस म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर वाद वाढत गेला. अचानक वाद शिगेला पोहोचला. त्यामुळे तलवारीने मुदकाप्पावर वार करण्यात आला तर इतरांनाही मारहाण केली. मुदकाप्पाला वर्मी घाव झाल्याने तो खाली कोसळला.
यावेळी आणखी काहीजण गंभीर जखमी झाले. सुनील अरबळ्ळी (वय 24), भरमजा अरबळ्ळी (वय 23), विठ्ठल अरबळ्ळी (वय 23, तिघेही रा. करडीगुद्दी), लक्काप्पा हळ्ळी (वय 20), विशाल बागडी (दोघेही रा. मारिहाळ) यांच्यासह आणखी दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या घटनेची फिर्याद रात्री उशिरापर्यंत मारिहाळ पोलीस स्थानकात दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे समजताच या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. करडीगुद्दी, मारिहाळ येथील काहीजण जखमी झाले तर सुनकुप्पी, सुतगट्टी, मल्लापूर येथीलही काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेत मुदकाप्पा जागीच कोसळला होता.
त्याला सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
जखमींनाही सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले होते. यामुळे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे एसीपी गणपती गुडाजी आणि मारिहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. या परिसरातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बोलेरोवरही दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये बोलेरोची समोरील काच फुटली आहे. या घटनेनंतर काही वेळाताच पोलीस दाखल झाले. त्यानंतर काही जणांना ताब्यात घेतले तर काहीजण फरारी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.
तणाव …
- कॅम्बेल स्टोअर्ससमोर दोन गटात तुंबळ हाणामारी
- हाणामारी झाल्याचे समजताच परिसरात मोठा तणाव
- गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काही जणांना घेतले ताब्यात
- बँकिंग व्यवस्थेतील काही नियमही बदलणार
- आता गृहकर्जावरील विशेष डिडक्शन मिळणार नाही









