नवी दिल्ली
जयपूर, गुवाहाटी आणि तिरूवनंतपुरम विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जानेवारीत याबाबतचा व्यवहार होण्याचे संकेत आहेत. सदरील तीनही विमानतळांच्या खासगीकरणास केंद्र सरकारने गेल्या ऑगस्टमध्ये मंजुरी दिली होती. गेल्या 1 सप्टेंबरला यासंदर्भात सुरक्षेच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली होती. जानेवारीत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड यांच्यासोबत करारावर सहय़ा होणार असल्याचे समजते. विमान तळांच्या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 6 विमानतळांसाठी बोली लावण्यात आली होती. वरील तिनही विमानतळांचा यात समावेश









