नवीन कंपन्यांमधील हिस्सेदारी खरेदीचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मागील तीन वर्षांत जिओ दूरसंचार आणि रिलायन्स रिटेलसोबत विविध नवनवीन व्यवसायात उडी घेतली आहे. तर नवीन कंपन्यांची हिस्सेदारीही रिलायन्सने केली आहे. त्यामुळे 21,514 कोटीची खर्च झाल्याची माहिती मिंटच्या एका अहवालातून दिली आहे.
2018-19 खरेदी केलेली हिस्सेदारी
डिसेंबर 2019 मध्ये रोबोटिक्स ऍण्ड आर्टिफिशिअल इंटेलीजन्स कंपनी एस्ट्रिया एअरोस्पेसमध्ये 23.12 कोटी रुपयात 51.78 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे.
नाउफ्लोट्स टेक्नॉलॉजीमध्ये 141.63 कोटी रुपयांना डिसेंबर 2019 रोजी 85 टक्क्यांचा वाटा खरेदी केला आहे. तर डिसेंबर 2020पर्यंत या कंपनीची हिस्सेदारी वाढून 89.66 टक्के करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
ग्रेबमधील 30 दशलक्ष डॉलर खर्च करत त्यामधील 83 टक्के वाटा रिलायन्सने घेतला आहे. 2018 साली 89 दशलक्ष डॉलरमध्ये खेळण्याची कंपनी हॅमलेजमध्ये 100 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली आहे. 10 दशलक्ष डॉलर खर्च करत ईजीगोवमधील 83 टक्क्यांचा वाटा 2018 मध्ये खरेदी केला आहे.
अन्य क्षेत्रातील गुंतवणूक
मॉर्गन स्टेनलीचा डिसेंबरमध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार रिलायन्सने 3 अब्जावधी डॉलरची गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये केलेली आहे. अधिकच्या माहितीप्रमाणे मीडिया आणि एज्युकेशन क्षेत्रातील कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी जवळपास 4 हजार कोटी रुपये रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा खरेदी करण्यास 1300 कोटी रुपये, दूरसंचार आणि इंटरनेट संस्थामधील खरेदीस 8 हजार कोटी आणि डिजिटल फर्मची खरेदी करण्यास 700 कोटी रुपये आणि केमिकल्स एनर्जी क्षेत्रातील कंपन्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी रिलायन्सने 2800 कोटीचा खर्च केलेला आहे.








