शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्याना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
मलप्रभा साखर कारखान्याने ऊस बिल देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. दास्तीकोप्प येथील तौफीकअहम्मद बशीरअहम्मद काशिमण्णवर या या शेतकऱयाचे 2016 व 2017 मधील आणि 2019-20 मधील 3 लाख रुपये ऊस बिल दिले नाही. त्यामुळे मी अडचणीत आलो असून 3 दिवसांचा वेळ देत आहे. तीन दिवसांत बिल मिळाले नाही तर विष प्राशन करुन आत्महत्या करु, असा इशारा या शेतकऱयाने जिल्हाधिकाऱयांना निवेदनाव्दारे दिला आहे.
मलप्रभा साखर कारखाना शेतकऱयांची ऊस बिले देण्यास टाळाटाळ करत आहे. या कारखान्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. या कारखान्याची साखर देखील जप्त करण्यात आली होती. तरी देखील शेतकऱयांची ऊस बिले अजूनही देण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तौफीक अहम्मद या शेतकऱयानेही ऊस पाठवून दिला होता. मात्र बिल मिळाले नाही. त्यामुळे आता हे आंदोलन करावे लागत आहे. आम्हाला जगणेच मुश्किल झाले आहे. त्यामुळे आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तेंव्हा तीन दिवसांत ऊस बिले मिळाले नाही तर आम्ही आत्महत्या करु, असा इशारा दिला आहे.









