श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ातील अवंतीपोरा येथे जवानांनी एका चकमकीत तीन दहशतावाद्यांचा खात्मा केला. चकमकीनंतर तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. अवंतीपोरामधील त्राल परिसरात गुरुवारपासून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला यश मिळाले असून भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये श्रीनगर येथील फारूक लंगू व मोसीन यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली होती.









