अचूक बातमी “तरूण भारत”ची, शनिवार 5 फेब्रुवारी 2022, दुपारी 12.00
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी रेट कमी होवू लागलेला आहे. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात पॉझिटीव्हीटी ही 12.19 वर आलेली आहे. नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बाधित वाढ रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यातमध्ये दहाच्या खाली बाधितवाढ आलेली आहे. सर्वात जास्त बाधित वाढ सातारा तालुक्यात आढळून येत आहेत. जिल्ह्यात नव्याने 423 जण बाधित आढळून आलेले आहेत.
स्वॅब घेणाऱ्यांची संख्या झाली 25 लाख 10 हजार 73
जिल्ह्यात स्वॅब घेणाऱ्यांची संख्या 25 लाख 10 हजार 73 वर पोहचलेली आहे. स्वॅब घेणाऱ्यांमध्ये दररोज साडे तीन ते चार हजार जणांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्यामध्ये शुक्रवारी दिवसभरात 3 हजार 470 जणांचे स्वॅब घेतले गेले. स्वॅब घेतलेल्यामध्ये नव्याने बाधित 423 जण आढळून आले आहेत. निगेटीव्ह येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ही दिलासादायक बाब आहे.
महाबळेश्वर, जावली अन् पाटण तालुक्यात कमी बाधित
जिल्ह्यातील बाधित वाढ कमी होवू लागलेली आहे. बाधित वाढ सगळय़ात कमी थंड हवेच्या महाबळेश्वर तालुक्यात आढळुन येत आहेत. तर त्या पाठोपाठ लगतच्या जावली तालुक्यात आढळून येत आहेत. पाटण तालुका हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सगळय़ात जास्त सातारा तालुक्यात बाधित आढळून येत आहेत. बाधित आढळून येणारे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे जावली 3, कराड 81, खंडाळा 21, खटाव 37, कोरेगाव 42, माण 40, महाबळेश्वर 4, पाटण 9, सातारा 101, वाई 22, सातारा 420, इतर 3, एकूण 423 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत.
सोमवारी
नमूने-3470
बाधित-423
सोमवारपर्यंत
नमुने-25,10,073
बाधित-2,77,304
मृत्यू-6574
मुक्त-259806









