प्रतिनिधी/ फातोर्डा
चैतन्य मंदिर समिती व चैतन्य परिवारतर्फे घोगळ हाउसिंग बोर्डमधील तीन कात्री राखणदेव मंदिरात सद्गुरुंच्या कृपेने 25 रोजी 13 तास ‘रामनाम संकीर्तन’ आयोजित करण्यात आले आहे. पहाटे 5 वा. रामनामाचा जप सुरू होईल, 5.30 वा. काकड आरती, त्यानंतर सकाळी 8 ते 9 भिक्षा फेरी, तर दुपारी 1 वा. आरती होईल. संध्याकाळी 5.30 वा. श्री मारुतीचे मंदिरात आगमन? होईल. त्यानंतर नामस्मरणाची समाप्ती करण्यात येऊन आरती व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.









