क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
येथे नुकत्यात घेण्यात आलेल्या कराटेबेल्ट परीक्षेत इंडियन कराटे क्लबच्या 3 कराटेपटूंनी ब्लॅकबेल्ट पटकाविला आहे.
औदुंबर सभागृह मुचंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत विविध ठिकाणाहून जवळपास 125 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता. या परीक्षेत बेळगावच्या इंडियन कराटे क्लबच्या आदित्या तळवार, सिद्धार्थ काशीद व लक्ष्मीकांत आनंदाचे यांनी ब्लॅकबेल्ट पटकाविला. त्यानंतर प्रमुख पाहुणे पीडब्ल्यूडीचे अभियंते संजयकुमार एच., उद्योगपती अमित मारूती कोनो, सुनील चौगुले, कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर, मारिहाळ पोलीस स्थानकाचे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. मंतूर, बसवंत वन्नूर, अशोक गुत्ती, रमेश पाटील, परशराम पाटील, सिद्दाप्पा काकती, रूपा काकती आदी मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंना ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. परीक्षा यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबचे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, निलेश गुरखा, हरीश सोनार, विजय सुतार, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, साहिल दड्डीकर, मोहित हिरेमठ, निलेश पाटील, गणेश पतकी यांनी विशेष परिश्रम घेतले.








