मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
मुचंडी, (ता. बेळगाव) जवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या तिहेरी अपघातात खणगावचा तरुण ठार झाला तर आणखी एक जण जखमी झाला आहे. मारिहाळ पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
जोतिबा कृष्णा पाटील (वय 23) रा. खणगाव असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. वैभव आनंद नागनगौडा (वय 22) रा. खणगाव हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
मारिहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोतिबा व वैभव हे दोघे जण मोटारसायकलवरून खणगावकडे जात होते. मुचंडीजवळ कारला मोटारसायकलची धडक बसून ते रस्त्यावर पडले. त्यावेळी याच मार्गावरून जाणारा एक ट्रक जोतिबाच्या पायावरून गेला. गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात हलवताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे.









