रस्ता दुरुस्तीबाबत कंत्राटदाराला केल्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
तिसरे रेल्वेगेट येथील ओव्हरब्रीज आणि रस्त्याची पाहणी जिल्हाधिकारी नीतेश पाटील व खासदार मंगला अंगडी यांनी शनिवारी केली. यावेळी रस्त्याच्याबाबत संबंधित कंत्राटदाराला त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
तिसऱ्या रेल्वेगेटजवळ ओव्हरब्रीजची उभारणी करण्यात आली. मात्र, येथील बाजूला असलेल्या रस्त्यांची दूरवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर रस्त्यांवर मोठमोठे ख•s पडले आहेत. रेल्वे ओव्हरब्रीजवर करण्यात आलेला रस्ता देखील खराब झाला आहे. त्यामुळे सर्व समस्या दूर करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना करण्यात आली आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वी तातडीने ही सर्व कामे पूर्ण करावीत, असे सांगण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.