पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या येणाऱया तिसऱया लाटेमध्ये सातारा जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिह्यात रुग्णालयांमध्ये बेडचे, ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आलेले आहे. लहान मुलांसाठी कोव्हिड हॉस्पिटल तयार ठेवण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठकीत दिली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोनाबाबत प्रशासकीय पातळीवर आणखी चांगल्या उपाययोजना करता याव्यात त्याकडे लक्ष द्या, अशा सुचना दिल्या. विधानपरिषदेचे सभापती रामराजेंनी मतदार संघात आमदारांनी लक्ष घातले तरीही परिस्थिती नियंत्रणात येईल, असा सल्ला उपस्थित आमदारांना दिला. आमदार महेश शिंदे यांनी आमदार फंडातुन व्हॅक्सिन खरेदी करण्याला मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी केली. दीपक चव्हाण यांनी जास्तीत जास्त लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न व्हावा असा मुद्दा मांडला.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आयोजित बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱयांनी या बैठकीत आतापर्यंत 12 लाख41 हजार278 एवढय़ा टेस्ट झालेल्या आहेत. त्यापैकी पॉझिटीव्ह रुग्ण 2 लाख 6 हजार 91 एवढे ओहत. 4986 जणांचा बळी गेलेला आहे. 1 लाख 91 हजार875 जण बरे झाले आहेत. 7583 सध्या ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. पहिल्या लाटेत विनाऑक्सीजनचे बेड 1270 होते. दुसऱया लाटेत 2967 एवढे होते. ऑक्सिजनचे पहिल्या लाटेत 1460 बेड होते तर दुसऱया लाटेत 3346 बेड होते. तर पहिल्या लाटेत व्हेंटीलेटरचे 139 बेड होते दुसऱया लाटेत 262 बेड होते. एप्रिलपासून जुनपर्यंत पॉझिटीव्हीटी रेट वढत गेला होता तो आता जुलै महिन्यात 8.4 एवढय़ावर आलेला आहे. रुग्णवाढीचा डबलिंगचा कालावधी हा 211 दिवसावर गेलेला आहे. प्रत्येक दिवशी 10 हजाराच्या पुढे टेस्ट केल्या जातात. दि.14 रोजी 15151 एवढया टेस्ट केल्या होत्या 6.7 एवढा पॉझिटीव्हटी आला. डिस्चार्ज होण्याचे प्रमाण 68.4 एवढय़ावर आले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कॉन्टक्ट ट्रेसिंग होत नाही. जिह्याचा कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगचा रेश्यो हा 11.32 तर हायरिस्क कॉन्टक्ट रेश्यो हा 6.50 एवढा आहे. ऍक्टीव्ह कंटेटमेंट झोन हे शहरी भागात 59 एवढे तर शहरी भागात 517 एवढे आहेत. जिह्यासाठी 9 लाख 88 हजार460 डोसेस आले होते. 35700 डोसेस शिल्लक असून वाया जाण्याचे प्रमाण 0.5 टक्के आहे, अशी माहिती दिली.
तसेच तिसऱया लाटेच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयात 15 खाटांचा अतिदक्षता विभाग तयार आहे. खंडाळा येथील जगताप हॉस्पिटलमध्ये आयसीयु आणि ओटू बेड आहेत. फलटण येथील वखार महामंडळामध्ये 35 आयसीयु बेड तर 100 ओटू बेड, कराड येथील यशवंतराव सभागृहात 32 आयसीयु बेड तर 80 ओटूचे प्रस्तावित आहे. सातारा शहरात जिल्हा महिला रुग्णालयात 80 आयसीयु बेड, 130 ओटू बेडची नियोजन करण्यात येणार आहे. गाव पातळीवर 30 खाटांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 100 खटांचे कोविड केअर सेंटर असे एकुण 1286 विलगीकरण कक्ष कार्यान्वित व बेड क्षमता 21824 एवढी करण्यात येणार आहे. जंबो हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त 50 आयसीयु बेडची निर्मिती करण्यात येणार आहें. तसेच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र 50 बेडचे बालरुग्णालय व 18 बेडचे बालरोग अतिदक्षता विभाग, फलटण नगरपालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये 35 बेडचे बालरोग कक्ष, कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात 15 बेडचे बालरोग कक्ष, जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकोसिससाठी 8 बेडचे सोय करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ऑक्सीजनची तयारी
तिसऱया लाटेच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 250 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर मशिन खरेदी, सीएसआरमार्फत 100 ऑक्सिजन कॉन्सिट्रेटर मशिन मिळालेत तर पुढील काळात 150 मिळाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान निधीतून 1हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर प्रस्तावित आहेत. तर 20 ठिकाणी एकूण 20 मेट्रीक टन क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लाँट उभारणी व कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. तिसऱया लाटेच्या अनुषंगाने जंबो रुग्णालयासाठ 20 मेट्रीक टन, सिव्हिल हॉस्पिटलसाठी 20 मेट्रीक टन, उपजिल्हा रुग्णालय कराडसाठी13 मेट्रीक टन, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी 13 मेट्रीक टन, काशीळ ग्रामीण रुग्णालयासाठी 13 मेट्रीक टन, उपजिल्हा रुग्णालय फलटणसाठी 6 मेट्रीक टन लागणार आहे. तसेच्सा अतिरिक्त लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक नियोजित आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
कृष्णा कारखान्यांची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार
आमदार महेश शिंदे यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीमुळे कराड तालुक्यात कोरोना वाढल्याचे चित्र दिसत आहे. तेथे प्रोजेक्शन प्रशासनाने घ्यायला हवे होते, असा मुद्दा मांडताच पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कृष्णेच्या पटय़ात रुग्ण वाढ आहे हे खरे आहे. परंतु कृष्णा कारखान्याच्या निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घेतली गेली आहे. काही लोक उच्च न्यायालयात गेले होते. एकाला तर फाईन झाला होता, चार जिह्यात कोरोना बाधित संख्या वाढत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रामराजेंनी आमदारांना तालुक्यात लक्ष घाला असा दिला सल्ला
जिल्हाधिकाऱयांनी आढावा मांडत असताना रामराजे म्हणाले, राज्याकडून काय येत आणि केंद्राकडून काय येत हे माहिती आहे. मी तुमच्यावर ब्लेम करत नाही. केंद्राने प्राधान्य दिले गेले पाहिजे. त्यांनी ठरवून दिले पाहिजे ते कळवत नाहीत. पॉझिटीव्हीटी कमी आणण्यासाठी प्रत्येक एसडीओ आणि आमदारांनी आपल्या तालुक्यात लक्ष घातले पाहिजे. नाहीतर आग लागल्यावर बंब शोधण्याची वेळ यायची, असाही टोला उपस्थित आमदारांना रामराजेंनी लावला.
चीनवरुन आणले का?
महेश शिंदे यांनी आमदारांचा फंड व्हॅक्सीन लस विकत घेण्यासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर रामराजेंनी बाळासाहेब पाटील यांना अजितदादांना बोलावे लागेल, असा कानमंत्र दिला. तर महेश शिंदे यांनी जिल्हाधिकाऱयांनी जीओ लाईटच्या टंचाईबाबत सांगताच महेश शिंदे म्हणाले, जिओ लाईट किती पाहिजे ते सांगा मी देतो, त्यावर रामराजे म्हणाले, मेड इन चायना का, त्यावर महेश शिंदे म्हणाले, मेड इन जर्मन, अशी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. तसेच महेश शिंदे यांनी पर्यटनस्थळी कोरोना बाधित संख्या कमी आहे आणि तरीही मनाई कशासाठी असे सांगितले.
वाईचे मॅप्रो कोव्हिड सेंटर जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरण करा
जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी वाई येथील म्रपो कोव्हिड सेंटर जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात यावे. ते चालवताना त्रास होतो आहे, असा मुद्दा मांडताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी तेथे औषधे आणि जेवण आमच्याकडून पुरवण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱयांनी शासनाच्या नियमानुसार तेथील वैद्यकीय अधिकाऱयांना वेतन दिले जात आहे. वरचे वेतन देणे हे आम्हाला जमणार नाही, असे ही त्यांनी सांगितले.








