जागतिक महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात जाणवल़ी ती काही अंशी कमी होत आहे. तोवर गणपतीचा सण येत असल्याने कोकणात त्याची भीती आणखीनच वाढली आह़े आरोग्य यंत्रणेने तिसऱया लाटेचा इशारा दिला आह़े त्यासाठीची पूर्वतयारीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही पूर्वतयारी तिसऱया लाटेपूर्वी पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आह़े
रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 75 हजार 752 लोकांना कोरोना बाधा झाली आह़े यात 2218 जणांचा मृत्यू झाला आह़े सध्या 1000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आह़े कोकणात विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्गात त्याची भीती अधिक प्रमाणात व्यक्त होत आह़े दुसऱया लाटेत असलेल्या कमाल मागणीच्या तीन पट
ऑक्सिजन निर्मितीची तयारी ठेवावी, अशा सूचना राज्य आरोग्य विभागाने सर्व जिह्यांना दिल्या
आहेत़
कोरोनाच्या रूग्णांसाठी मे महिन्यात
ऑक्सिजनची कमाल मागणी नोंदवण्यात आल़ी ही कमाल मागणी रत्नागिरी जिह्यात 27 मेट्रीक टन ऑक्सिजनची एवढी होत़ी कोरोनाची तिसरी लाट अधिक भयानक स्वरूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आह़े त्यासाठी रत्नागिरी जिह्याला सुमारे तिनपट
ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आह़े त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून 90 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेची तयारी सुरु केली आह़े
ऑक्सिजन निर्मितीसाठी कोरोना रुग्णालयाशेजारी प्रकल्प उभे करण्याचे काम सुरु आह़े महिला रुग्णालय रत्नागिरी येथे 20 मेट्रीक टन, जिल्हा शासकीय रुग्णालय येथे 20 मेट्रीक टन, दापोली येथे 11 मेट्रीक टन, चिपळूण येथे 10 मेट्रीक टन, केळवलीत 6.85 मेट्रीक टन, संगमेश्वरमध्ये 6.85 मेट्रीक टन, रायपाटण येथे 6.85 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आह़े यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय येथे 14 मेट्रीक टन ऑक्सिजन हवेतून तर 7.09 ऑक्सिजन लिक्वीड फॉर्ममध्ये उपलब्ध होणार आह़े तसेच एका खासगी रुग्णालयामध्ये देखील ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आह़े
त्याचप्रमाणे रत्नागिरी, पाली, सिद्धीविनायक हॉस्पिटल या†िठकाणी
ऑक्सिजनची उपलब्धता होणार आह़े तसेच पंतप्रधान केअर फंडातून शासकीय रुग्णालय गुहागर व दापोली याठिकाणी
ऑक्सिजन प्लांटची योजना कार्यान्वित करण्यात येणार आह़े सिंधुदुर्ग जिह्यात दुसऱया लाटेमध्ये 9 जूनला कमाल मागणी नोंदवण्यात आली होत़ी ही मागणी 9 मेट्रीक टन एवढी होत़ी त्यापूर्वी दररोज 5 ते 6 मेट्रीक टनाची मागणी होत़ी कमाल मागणीच्या तीन पट म्हणजे 27 मेट्रीक टन एवढी ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आह़े सध्या या जिह्यात 19.6 मेट्रीक टन एवढी
ऑक्सिजन निर्मितीची स्थापित क्षमता आह़े आणखी 4.78 मेट्रीक टन एवढय़ा ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी प्रकल्पांची उभारणी होत आह़े जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आह़े
ऑक्सिजन निर्मितीच्या प्रस्तावित प्रकल्पांकरिता कंत्राटदार नियुक्त झाले आहेत़ कामकाज सुरु आह़े पण काम पूर्ण होण्यासाठी विलंब लागत आह़े गणपती सणामध्ये तिसरी लाट आल्यास
ऑक्सिजन निर्मितीची गरज अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकत़े तोवर प्रकल्पांचे काम पूर्णत्वास जाईल काय, याची चिंता लोकांना लागून राहिली आह़े
एका बाजूला तिसऱया लाटेच्या तयारीसाठी
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीची पावले पडत आहेत़ परंतु मनुष्यबळासाठी मात्र तेवढे गंभीर प्रयत्न होताना दिसत नाहीत़ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱयांची पुरेशा प्रमाणात पदे भरण्यात आली नाहीत़ या पदभरतीसाठी वेगळा विचार सुरू झाला आहे, असे रुग्णांना जाणवत नाह़ी तारा मेडिकल कर्मचारीदेखील पुरेशा प्रमाणात हजर नाहीत़ कोरोनाची मोठी लाट येऊन वर्ष उलटले तरी मनुष्यबळ भरतीची अद्याप शासकीय व्यवस्था झालेली नाह़ी कदाचित काही महिन्यात कोरोना संपेल, पण पुरेसे मनुष्यबळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे असेल काय, हा प्रश्न कायम
आह़े राज्य परिवहन महामंडळाने कोकणात येणाऱया गणेशभक्तांसाठी मोठय़ा प्रमाणात बसेस सोडण्याचे ठरवले आह़े मध्य रेल्वे, कोकण रेल्वेने गाडय़ांच्या जादा फेऱया सोडण्याचे ठरवले आह़े कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी मोदी स्पेशल रेल्वेगाडी गणेशभक्तांकरिता सोडण्याचे घोषित केले आह़े यावर्षी मुंबई महापालिका निवडणूक असल्याने तेथील अनेक उत्साही राजकीय कार्यकर्ते पुढे आले आहेत़ खासगी आरामबस मोफत स्वरूपात गणेशभक्तांना उपलब्ध करून देण्यासाठी तेथे चढाओढ लागली आह़े असे असताना गेल्यावर्षीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात गणेशभक्त भाद्रपदात आपापल्या गावी येणार हे स्पष्ट झाले आह़े
एवढय़ातच राज्य सरकारने गणेशभक्तांच्या प्रवासासाठी काही निर्बंध जारी केले आहेत़ ज्या लोकांचे कोरोना लसीच्या दोन मात्रा झाल्या आहेत किंवा तीन दिवसापूर्वी एवढय़ा अवधीत आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आली आहे, अशा लोकांना कोकणात सहजरितीने आपल्या गावी येऊ दिले जाणार आह़े ज्यांना या दोन्ही बाबी पूर्ण करता आल्या नाहीत, त्यांना गाडीतून उतरताक्षणी अँटीजन चाचणीला सामोरे जावे लागणार आह़े सरकारने हे धोरण मागे घ्यावे, अशा मागण्या सरकारकडे येऊ लागल्य़ा
कितीही आंदोलने करा पण लोकांच्या जीवित रक्षणासाठी तूर्त मंदिरे उघडणार नाहीत, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आह़े आता गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांकरिता सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लोकांचे लक्ष लागले आह़े सरकारने मागण्यांच्या दबावाखाली चाचण्यांचा निर्णय रद्द केला तर साथरोग प्रसाराची भीती वाढणार आह़े गणेशभक्तांच्या दबावाखाली चाचणीची अंमलबजावणी ढीलेपणाने केली गेली तरी देखील भीती कायम राहणार आह़े यामुळे सरकारला धोरण ठरवावे लागणार आह़े सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना चाचण्या करण्यामध्ये शिथीलता आली आह़े खरेतर आता चाचण्यांचे प्रमाण मानकांपेक्षाही अधिक ठेवून साथरोग उच्चाटनासाठी कंबर कसायला हव़ी रुग्णसंख्या कमी होत असताना चाचणीचे प्रमाण वाढविले गेल्यास रोगावर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होते असे मानण्यात येत़े त्यासाठी प्रशासकीय आग्रह कायम राहिला पाहिज़े
सुकांत चक्रदेव








