पणजी/ प्रतिनिधी
देशात तिसरी लाट आली तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू केली आहे. या मोहि?अंतर्गत पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा खासदार विनोद सोनकर यांनी दिली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय आरोग्य स्वयंसेवक अभियान आणि आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याच्या उपक्रमाचा आज शनिवार दि. 7 रोजी शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्री. सोनकर बोलत होते. भाजपच्या वैद्यकीय विभागाचे संयोजक डॉ. शेखर साळकर यांच्या नेतृत्वाखाली 20 डॉक्टरांच्या पहिल्या तुकडीला आज एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे आदी उपस्थित होते.
श्री. सोनकर म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 60 डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे डॉक्टर 15 ऑगस्ट रोजी उर्वरित 40 डॉक्टरांना प्रशिक्षण देतील. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते याचे प्रशिक्षण घेतील. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर हे कार्यकर्ते गावोगावी जाऊन याविषयी जागृती करतील. तसेच रुग्णांना हवे ते सर्व सहकार्य करतील. यामध्ये रुग्णांना औषधे पुरवणे, ऑक्सजिन पुरवणे आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी याविषयी जागृती करतील, अशी माहिती श्री. सोनकर यांनी दिली.
यावेळी डॉ साळकर म्हणाले, राज्यात तिसरी लाट आल्यास परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी भाजपने आत्तापासून काळजी घेतली आहे. या उपक्रमात लसीकरणाविषयी संकल्पना आणि सामान्य ज्ञान समाविष्ट असेल. रुग्णांना योग्य आहार आणि योगाद्वारे रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची याचे मारगदर्शन केले जाईल. कोविड -19 च्या तिसऱया लाटेचा उदेक झाल्यास लोकांना आणि प्रशासनाला मदत करता यावी यासाठी संपूर्ण देशातील भाजपच्या कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे श्री. सालकर यांनी सांगितले.
या मोहि?अंतर्गत प्रशिक्षित डॉक्टर बूथस्तरीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. प्रत्येक बूथमधून दोन तरुण (पुरुष आणि महिला) मोहिमेसाठी निवडले जातील. प्रशिक्षित कार्यकर्ते जागृती करण्यासाठी आणि आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी विविध गावांना भेट देतील. प्रशिक्षण घेतलेले सज्ज स्वयंसेवक इतरांना मदत करू शकतील.
या उपक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन लोकांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. ऑक्सजिन पातळी तपासली जाईल. तसेच मूलभूत वैद्यकीय मदत पुरवली जाईल, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली.
कोविड -19 विरूद्धच्या लढाईबाबत भाजप अत्यंत गंभीर आहे. हा कार्यक्रम आरोग्याभिमुख आहे. कोविड -19 हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. आणि आमचे लक्ष्य लवकर निदान आणि शक्मय तितके कमी मृत्यू असे असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले.
या उपक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी डॉ. साळकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात डॉक्टर आणि आयटी तज्ञांचा समावेश आहे. पक्षाचे प्रवक्ते तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि प्रवक्ते शर्मद रायतुरकर हे देखील प्रशिक्षण उपक्रमाचा सक्रिय भाग आहेत.









