सेन्सेक्स 290 अंकांनी वधारला : विदेशी भांडवलाचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात सोमवारी पहिल्याच दिवशी तेजी प्राप्त केलेल्या शेअर बाजारात मंगळवारी घसरणीचे सत्र राहिले तर बुधवारी पुन्हा तेजीचा प्रवास राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. तिसऱया दिवशी भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने विदशी भांडवलातील प्रवाह सुरु राहिल्याने निर्देशांकांनी समाधानकारक कामगिरी केल्याचे पहावयास मिळाले आहे. सदरच्या कामगिरीने मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते.
दिवसभरातील व्यवहारानंतर दिवसअखेर सेन्सेन्क्स 290.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 34,247.05 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 69.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,116.15 वर बंद झाला. दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक लाभ प्राप्त करत जवळपास 8 टक्क्मयांची तेजी मिळाली होती. सोबत कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, ऍक्सिस बँक आणि स्टेट बँक यांचा समावेश राहिला आहे. अन्य कंपन्यांमध्ये हिरोमोटो कॉर्प, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि ओएनजीसी कंपनीच्या समभागात घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
विदेशी संस्थेकडून मंगळवारी निक्वळ स्वरुपात 490.81 कोटी रुपयांच्या मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत, अशी माहिती शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीमधून समोर आली आहे. वित्तीय कंपन्यांच्या समभागांच्या लिलावामुळे बाजारात तेजी मिळाली होती. तसेच अन्य आशियातील मुख्य बाजारात चीनचा शांघाय आणि हाँगकाँग हे नुकसानीत राहिले आहेत तर दक्षिण कोरियातील सोल आणि जपानचा टोकीयो बाजार मात्र तेजीत राहिला होता. चालू आर्थिक वर्षात कोविडमुळे आर्थिक क्षेत्र प्रभावीत होणार असल्याचा अंदाज आहे. पुढील आर्थिक वर्षात देशातील आर्थिक वृद्धीदर 9.5 टक्के राहणार आहे, असा अंदाज फिचने व्यक्त केला आहे.
असल्याचे संकेत फिच या रेटिंग एजन्सीने आपल्या अहवालातून दिले असल्याने ही बाब काहीशी दिलासादायक ठरण्याचा अंदाज उद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.








