स्वतःचे ड्रीम वेडिंग कसे असणार याचा खुलासा अभिनेत्री जान्हवी कपूरने केला आहे. डेकोरपासून स्थळ, फन बॅचरलेट पार्टीपर्यंतच्या इच्छा अभिनेत्रीने एका नियतकालिकाच्या फोटोशूटदरम्यान व्यक्त केल्या आहेत.
दोन दिवसांमध्ये विवाहाचे विधी संपवू इच्छिते. माझी बॅचलरेट पार्टी याटवर कॅपरीमध्ये होईल तर विवाहसोहळा तिरुपतिमध्ये होणार असल्याचे जान्हवी सांगते. मेहंदी आणि संगीत सेरेमनी मायलापोर येथील घरी होणार आहे. श्रीदेवी यांच्या वडिलांचे हे घर आहे. जान्हवीच्या विवाहाकरता मोगऱयाची फुले आणि मेणबत्त्यांनी सजावट होणार आहे. वधूच्या स्वरुपात कांजीवरम किंवा पट्टू पवाडाई साडी परिधान करणार जी गोल्ड आणि आइवरी थीमवर आधारित असेल असे तिने म्हटले आहे.
समजुतदार व्यक्तीच्या शोधात

माझी बहिण अंशुला सर्व गोष्टींवर नजर ठेवेल, तर वडिल बोनी कपूर विवाहादरम्यान अत्यंत भावुक होऊ शकतात. माझा होणारा नवरा एक समजुतदार व्यक्ती असेल, कारण आतापर्यंत अशा कुठल्याच व्यक्तीला भेटले नसल्याचे जान्हवीने सांगितले आहे.
आगामी चित्रपट जान्हवीने अलिकडेच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. या चित्रपट आनंद एल. राय यांनी निर्मित केला आहे. याचबरोबर ती ‘दोस्ताना 2’मध्येही दिसून येणार आहे. वडिल बोनी कपूर यांच्यासोबत ती एक चित्रपट करत आहे. हा चित्रपट ‘हेलेन’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे.









