ऑनलाईन टीम / डेहराडून :
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून तिरथसिंह रावत यांनी आज दुपारी चार वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी राजभवनात त्यांना शपथ दिली.
तिरथसिंह रावत उत्तराखंडचे 11 वे मुख्यमंत्री झाले आहेत. बुधवारी डेहराडून येथे झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची पक्षनेतेपदी निवड झाली. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नवे मुख्यमंत्री म्हणून तिरथसिंह रावत यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तराखंडचे प्रभारी रमणसिंह, रमेश पोखरियाल, कार्यकारी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, राज्याचे अध्यक्ष बनशेधर भगत, दुष्यंतकुमार गौतम, यशपाल आर्य उपस्थित होते.