अमेरिकेने केले होते आमंत्रित
वॉशिंग्टन
तिबेटच्या निर्वासित सरकारचे प्रमुख लोबसांग सांग्ये हे अमेरिकेचे अध्यक्षीय भवन म्हणजेच व्हाइट हाउसमध्ये पोहोचले आहेत. तिबेटी सरकारच्या कुठल्याही नेत्याचा 6 दशकांमधील अशाप्रकारचा हा पहिलाच दौरा आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे चीनची नाराजी आणखीन वाढणार आहे. तिबेटविषयक अमेरिकेचे विशेष समन्वयक रॉबर्ट डेस्ट्रो यांच्या आमंत्रणावर सांग्ये यांनी व्हाइट हाउसचा दौरा केला आहे. या अभूतपूर्व भेटीमुळे अमेरिकेच्या अधिकाऱयांसोबत भागीदारी वाढण्याची शक्यता असल्याचे धर्मशाळा येथील तिबेटी प्रशासनाने म्हटले आहे.









