राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन
ऑनलाईन टीम / मुंबई :
शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, गेले अनेक वर्ष शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहे. मात्र, शिवसेनेने तिथीचा हट्ट सोडून 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, शिवसेनेने तिथीचा हट्ट सोडावा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करावी.









