प्रतिनिधी / बेळगाव :
उद्योख खात्री योजनेंतर्गत तालुक्मयात विविध कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांच्या समस्येतही वाढ होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. याची दखल घेत तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी नुकतीच कडोली येथे कामगारांची भेट घेवून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी कामगारांनी कामासंदर्भात काही समस्या मांडल्या. याचबरोबर गावानजीकच कामे देण्याची मागणी केली. यावेळी कलादगी यांनी जर गावात कामे असतील तर तुम्हाला देवू. पण कामही हवे आणि ते गावात हवे असेल तर हे चुकीचे असून काही दिवस बाहेर गावी जावून करावे, असे सांगितले.
याचबरोबर पाणी समस्या अथवा इतर समस्यांबाबत कलादगी यांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ग्राम पंचायत विकास अधिकारी उपस्थित होत्या.









