प्रतिनिधी / तासगाव
जळगाव शहरासह तालुक्यात सोमवारी आठ गावात बारा जणांना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तर तासगाव शहरात सलग . तिसऱ्या दिवशीही 0 रुग्ण असे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत 182 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 3132 झाली आहे. तालुक्यात सोमवारी सापडलेले रूग्ण असे…सावळज-3,राजापूर-2, ढवळी-2, तसेच मतकुणकी, मणेराजुरी, योगेवाडी, खुजगाव, वासुंबे, येथे प्रत्येकी एक असे एकूण 12 रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात गेल्या 28 दिवसापासून रूग्ण संख्या कमी होऊन दिलासा दायक चित्र पाहवयास मिळालेले आहे. तर तासगाव शहरात सलग . तिसऱ्या दिवशी ही 0 रुग्ण असेच पहावयास मिळाले आहे.
Previous Articleकोल्हापूर : बच्चे सावार्डेत विहरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Next Article पार्किंग वादातून दोघांवर चाकू हल्ला








