प्रतिनिधी / भिलवडी
तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन २८५० रुपये प्रमाणे दर देणार असल्याची खासदार संजयकाका पाटील यांनी घोषणा केली आहे. तुरची येथे कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत खा.संजयकाका यांनी माहिती दिली.
तासगाव – पलूस तालुका सहकारी कारखान्याची मालमत्ता एस.जी.झेड अॅड. एस.जी. ए. शुगर्स या कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर २०२०-२०२१ या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्यात आला आहे.
यापुढे बोलताना खा.संजयकाका पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नऊ ते दहा वर्षे बंद होता. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे साखर उतारा व तोडणी वाहतूक खर्च यांच्या आधारे एफआरपी निश्चित होऊ शकत नाही. लगतच्या सर्व कारखान्यांकडे सहवीज, आसवनी असे जादा उत्पन्न मिळवून देणारे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत. केवळ साखरे च्या उत्पादनाच्या आधारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर द्यावा यासाठी तोटा सहन करून ही २८५० रुपये प्रतिटन दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.