हातनूर / वार्ताहर
बोरगाव ता तासगाव येथील एकाच कुटुंबातील 11 व्यक्तींचा अँटिजेंन रॅपिड टेस्ट कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य समुदय अधिकारी डॉ.सुरेकर यांनी दिली.
बोरगाव ता तासगाव मधील कोरोना पॉझिटिव्ह संसर्ग होऊन मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातून कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला आहे. गावातील एकाच कुटुंबातील 11 सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोणतेही लक्षण नसणाऱ्या रुग्णांना होम कोरोंटाइन करण्यात येणार आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग झपाट्याने वाढत चालल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
प्राथमिक आरोग्य बोरगाव केंद्राच्या अंतर्गत एका दिवसात 57 अँटिजेंन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या आहेत. पैकी बोरगाव गावातील एकाच कुटुंबातील 11सह इतर 1 रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. बोरगावमधील आजची कोरोना पॉझिटिव्ह संख्या 12 झाली आहे. यामुळे नागरिकांतून भितीचे वातावरण व एकाच खळबळ उठली आहे .
तसेच निंबळक मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 11 लोकांची कोरोना तपासणी घेण्यात आलेल्यापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ.सुरेकर यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








