बारामती / प्रतिनिधी :
बारामतीमधील राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे उर्फ चिकु पाटील यांच्यावर सोमवारी रात्री आठच्या वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून पोबारा केला होता. बारामती पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत सूत्रधारसह हल्लेखोरांना अवघ्या 6 तासात ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे सायंकाळी आपल्या गाङीतून माळेगांव येथील संभाजीनगर येथे वडापाव घेण्यासाठी आले होते. वङापाव घेऊन ते गाङीकङे निघाले असता अचानक बुलेटवर तोंङ बांधून आलेल्या दोघांनी तावरे यांच्या छातीवर बंदुकितून गोळ्या झाङल्या. तसे तावरे खाली कोसळले. त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी क्षणात खाली येऊन आरङाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुणे येथून निष्णात डॉक्टरांची टीम आली. छातीतून गोळी काढण्यात आली असून, ते अद्यापही शुद्धिवर आलेले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने सूत्रे हालवत तपासाला सुरुवात केली. अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक निरीक्षक योगेश लंगुटे नितीन मोहिते राहूल जाधव यांनी तपासातून सुत्रधारासह चौघांना रातोरात ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, एका दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने काही दिवसापुर्वी पिस्तूल खरेदी केले तसेच या मुलानेच तावरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. राजकिय वादातुन यातील प्रमुख सूत्रधार प्रशांत मोरे यानेच हा कट रचला होता. मोरेसह राहूल उर्फ रिबेल यादव, विनोद उर्फ टॉम मोरे व एक अल्पवयीन अशा चौघांनी नियोजनपुर्वक हे कृत्य केले. प्रशांत मोरेला मुंबईत अटक केली. तर एक जण उरळीकांचन येथे असल्याची माहिती मिळाली.पोलीसांनी अवघ्या सहा तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.