उचगांव / वार्ताहर
चालकाचा ताबा सुटल्याने तावडे हॉटेलनजीक पुणे-बेंगलोर महामार्गावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेला सुरक्षा कठडा तोडून खाली गेला. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हा कंटेनर ( एन एल क्यू 0344) कागलच्या दिशेने जात होता. कंटेनर वेगात असल्याने चालकाचा त्यावरील ताबा सुटला. कंटेनर रस्त्याच्याकडेला असलेला कठडा तोडून खाली गेला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कंटेनरचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच गांधीनगर पोलिस घटनास्थळी आले. काही काळ वाहतुकीत अडसर निर्माण झाला. पोलीस हवालदार गजानन कुराडे, शशिकांत जाधवर यांनी वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
Previous Articleपंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाबाबत घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय
Next Article पावसामुळे उत्तर सोलापूरातील नंदूर येथे घरांची पडझड









