झाडांच्या पडझडमुळे विज पुरवठय़ात खंड
प्रतिनिधी / ताळगांव
मंगळवारी तसेच बुधवारी वादळीवाऱयासह पडलेल्या पावसामुळे ताळगांव भागात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान काही झाडे विजेच्या ताऱयांवर पडल्यामुळे अनेक ठिकाणी रात्र-दिवस विज नसल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
ताळगांव येथील आमराल बांध, कॉम्युनिटी सेंटर जवळील सारख्या प्रमुख भागात दिवसभर विज नसल्याचे दिसून आले. बुधवारी सायंकाळी विज खात्याच्या कर्मचाऱयांतर्फे विज तारेवर पडलेल्या झाडांच्या फांदय़ा काढून विज वाहीनी दुरुस्ती केली.
ताळगांव भागात अजुनही अनेक ठिकाणी धोकादायक झाडे जी त्या त्या भागातील विज पुरवठा ठप्प करु शकतात. याकडे विज खात्याने अग्निशामक दलाच्या सहाय्याने लक्ष घालून धोकादायक झाडे हटवावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.









